नवलच! लग्नाआधी गरोदर असलेल्या Amy Jackson ने शेअर केला Ultrasound Video; दिसत आहे बाळाची हालचाल (व्हिडिओ)
Amy Jackson (संग्रहित-संपादित प्रतिमा)

2010 साली तमिळ चित्रपटापासून आपली कारकीर्द सुरु करणारी ब्रिटीश अभिनेत्री, अॅमी जॅक्सन (Amy Jackson) सध्या गरोदर आहे. लग्नाआधी गरोदर राहिल्याने तसेच सोशल मिडियावर आपल्या प्रेग्नन्सीबाबत अनेक फोटोज-व्हिडिओज शेअर केल्याने ती सध्या बरीच चर्चेत आहे. आता अॅमीने चक्क आपला हॉस्पीटलमधला अल्ट्रा साऊंड व्हिडीओ (Ultrasound Video) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अॅमीच्या बाळाची हालचाल दिसत असून, हा व्हिडिओ अतिशय व्हायरल होत आहे. आपली इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून अॅमीने हा व्हिडिओ शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

Amy Jackson shares the beautiful glimpse of her baby in Ultrasound! Follow @glamourupdate * * #glamourupdate @iamamyjackson

A post shared by Glamour Update (@glamourupdate) on

गेले दोन वर्षे अॅमी आणि जॉर्ज पानायीओतो (George Panayiotou) एकमेकांना डेट करत आहेत. जॉर्ज हा लंडनमधील प्रसिद्ध बिल्डर अंद्रेस पानायीओतो यांचा मुलगा आहे. त्याने स्वत:ची ‘द अॅबिलीटी ग्रुप’ नावाची कंपनी देखील सुरू केली आहे. जानेवारी महिन्यात अॅमी आणि जॉर्ज यांनी साखरपुडा केल्याचे घोषित केले होते. त्यानंतर गरोदर असलेल्या अॅमीने प्रेग्नंसीमधील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचा सपाटाच लावला होता. आता तिने आपला सोनोग्राफीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 2020 मध्ये अॅमी व जॉर्ज लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

... coming soon

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

 

View this post on Instagram

 

What a spectacular #PronoviasFashionShow Congratulations Amandine and the entire @pronovias team

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

दरम्यान, 2018 मध्ये रजनीकांत यांच्यासोबत फिल्म '2.0' मध्ये अॅमी मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तीने अक्षयसोबत 'सिंह इज ब्लिंग' या चित्रपटातही लीड मुख्य भूमिका साकारली होती. सोबतच तिने अनेक तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.