2.0 सिनेमामध्ये अक्षय कुमारने असा साकारला खलनायकी अवतार (Video)
आता 2.0 हा सिनेमा येत्या 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
2.0 Movie Akshay Kumar Look : रजनीकांत (Rajnikanth) आणि अक्षयकुमार (AkshayKumar) यांचा बहुप्रतिक्षित 2.0 या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार्या अक्षय कुमारच्या लूकमागील मेहनत खास व्हिडिओच्या माध्यमातून रसिकांसमोर आली आहे. Prosthetic प्रोस्थेटिक्स (कृत्रिम मेकअप) च्या मदतीने साकारण्यात आला आहे. अक्षयच्या मेकअपच्या प्रक्रियेदरम्यान त्याच्या संयम आणि धैर्याची परीक्षा होती.
नकारात्मक भूमिकेत दिसणार्या अक्षय कुमारच्या या लूकसाठी मेकसाठी सुमारे तीन ते साडे तीन तास लागत होते. मेकअप करताना लागणार्या संयमामुळे अधिक शांत आणि धैर्यवान झाल्याची कबुली अक्षय कुमारने दिली आहे.
मेकअप करण्याइतकीच मेकअप हटवणं ही प्रक्रियादेखील त्रासदायक होती. मेकअप काढायला अक्षय कुमारला दीड तासाचा वेळ लागत होता. तसेच मेकअप झाल्यावर अक्षयला केवळ लिक्विड डाएट घेणं शक्य होतं.
रजनीकांत आणि अक्षयकुमार यांच्या अभिनयाची रूपेरी पडद्यावर पहिल्यांदा जुगलबंदी पाहता येणार आहे. 2.0 हा सिनेमा 2010 साली प्रदर्शित झालेल्या 'एंथीरन' (Enthiran)चा सिक्वेल आहे. आता 2.0 हा सिनेमा येत्या 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.