2.0 Box Office Collection: जगभरात बॉक्सऑफिसवर 500 कोटीच्या पार कमाई, Baahubali चा विक्रम मोडला
या सिनेमाचे दिग्दर्शन एस. शंकर (S. Shankar) यांनी केले आहे.
2.0 Box Office Collection: आठवडाभरापूर्वी रजनीकांत (Rajinikanth) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा सिनेमा प्रदर्शित झाला. बघता बघता या सिनेमाने बॉलिवूडचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. बॉक्सऑफिसवर सुपर डुपर हिट असलेल्या हा सिनेमा नवा इतिहास रचण्याच्या तयारीमध्ये आहे. आज सिनेमाच्या रिलीज नंतर सातव्या दिवशी जगभरात 500 कोटी कमाईचा आकडा पार करत ' बाहुबली' (Baahubali) सिनेमावर मात केली आहे.
हिंदी व्हर्जनमधील या सिनेमाने सातव्या दिवशी 9.50 कोटी कमावत एकूण हिंदी व्हर्जनची कमाई 132 कोटींच्या पार गेली आहे. करण जोहरने आज ट्विटरच्या माध्यमातून 500 कोटींचा टप्पा पार केल्याचं खास ट्विट केलं आहे.
चेन्नई , आंध्र प्रदेश , तामिळनाडू या राज्यात सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. या सर्व ठिकाणी सिनेमाने पहिल्याच दिवशी 2 कोटीहून अधिक कमाई केली. 2.0 सिनेमाला Piracy च्या धोक्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी Twitter वर खास आवाहन !
आधुनिक तंत्रज्ञान, खास मेकअप आणि व्हीएफएक्सच्या मदतीने साकारण्यात आलेल्या या सिनेमावर मागील 3-4 वर्ष मेहनत घेतली जात आहे. 2.0 हा भारतातील सर्वात महागडा सिनेमा असून यासाठी 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन एस. शंकर (S. Shankar) यांनी केले आहे.