Bigg Boss Marathi 2, 30th May 2019, Day 4 Episode Updates: रुपालीचा आकांडतांडव; बिचकुले यांचा सर्वात मोठा अपमान, दिली कॅमेरा फोडायची धमकी तर परागच्या 'या' वाक्यामुळे चिडल्या तीन मुली
दुसऱ्या दिवशी परत बिचुकले नेहाशी इतरांच्या माघारी बोलतात. एक टीम म्हणून नेहाला सुरक्षित करणे अपेक्षित असते. सर्वजण हेच करतात मात्र बिचुकले एकटे वेगळा निर्णय घेतात
Bigg Boss Marathi 2, Episode 5 Highlights: कालच्या भागात सुरु झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये, आतापर्यंत मैथिली, वीणा, अभिजित, किशोरी, सुरेखा आणि विद्याधर या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यापासून सुरक्षित झाले आहेत. रुपाली आणि पराग या शेवटच्या जोडीला आता हा टास्क देण्यात आला आहे. या टास्कनुसार नेहा आणि विना डोक्यावर ‘अपात्र’ लिहिण्यास आणि गळ्यात पाटी घालण्यास तयार होतात. अशाप्रकारे पराग आणि रुपाली सुरक्षित होतात.
या दरम्यान नेहा बिचुकले यांच्या वागण्याने प्रचंड चिडते. बिचुकले जे काही करत आहे मुद्दाम करत आहे असे म्हणत नेहा अक्षरशः रडू लागते. दुसरीकडे पराग घरातील तीन मुली आपल्याला आवडत नसल्याचे सांगतो, त्यामध्ये वैशाली, शिवानी आणि वीणादेखील आहे. त्यामुळे घरात या तीन मुली चिडलेल्या आहेत. त्यात शिवानीच्या ही गोष्ट मनाला लागल्याने तिला रडू फुटते.
संपूर्ण टास्क संपल्यानंतर अखेर शिवानी, नेहा आणि शिव या आठवड्यासाठी असुरक्षित आहेत. दुसऱ्या दिवशी परत बिचुकले नेहाशी इतरांच्या माघारी बोलतात. एक टीम म्हणून नेहाला सुरक्षित करणे अपेक्षित असते. सर्वजण हेच करतात मात्र बिचुकले एकटे वेगळा निर्णय घेतात. नेहा ही गोष्ट सगळ्यांना सांगते आणि परत भांडण, चिडाचिड सुरु होते. रुपाली आकांडतांडव करत बिचुकले कसे चुकीचे वागत आहे हे त्यांचा अपमान करत त्यांना सांगते. मात्र रुपालीने जो त्रागा केला तो फक्त बिचुकले यांच्यासाठी नसून, माधव, नेहा आणि शिवानी यांच्यासाठीदेखील असल्याचे ती नंतर वीणाला सांगते.
घरात दुपारच्या जेवणावरून चर्चा सुरु होते. परत बिचुकले यांच्यामुळे शिवानीचा आवाज चढतो, त्यावर वीणा बिचुकले यांना महत्व न देता तुझा आवाज कमी कर असे शिवानीला सांगते, मात्र या छोट्या गोष्टीमुळे शिवानी आणि वीणा यांमधील शाब्दिक चकमक वाढत जाते.
(या आठवड्यात वोटिंग प्रक्रिया बंद असल्याने वोटिंग लाईनही बंद आहेत.)