Bigg Boss Marathi 2, 29th May 2019, Day 3 Episode Updates: नॉमिनेशन टास्कमुळे अभिजित आणि रुपालीवर आली रडायची पाळी; तर नऊवारी साडी नेसून विद्याधर यांनी सादर केली लावणी

असे झाले तर त्या दोघी नॉमिनेशन प्रक्रियेपासून वाचू शकतात

Bigg Boss Marathi 2, Day 3 Episode (संग्रहित-संपादित प्रतिमा)

Bigg Boss Marathi 2, Episode 4 Highlights: अखेर बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यातील पहिला नॉमिनेशन टास्क सुरु झाला आहे. शिवानी आणि नेहामध्ये हा टास्क सुरु होतो, शिवानी आणि नेहाला बिचुकले आणि वैशाली या दोघांना 8 तासांसाठी अडगळीच्या खोलीत राहण्यासाठी तयार करायचे आहे. असे झाले तर त्या दोघी नॉमिनेशन प्रक्रियेपासून वाचू शकतात. मात्र बिचुकले आणि वैशाली या दोघांनीही नकार दिल्याने नेहा व शिवानी या आठवड्यासाठी नॉमिनेट होतात.

दिवसाच्या शेवटी नेहा आणि पराग यांच्यामधील किचनमध्ये वाया गेलेले अन्न आणि गॅस वरील भांडण उफाळून येते. अखेर पराग किचनमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर मैथिली आणि वीणामध्ये नॉमिनेशन टास्क सुरु होतो. वीणाला, अभिजित केळकरला त्याच्या कुटुंबाचे फोटो नष्ट करण्यास तयार करायचे आहे, तर मैथिलीला रुपालीचा टेडी नष्ट करण्यास तिला तयार करावयाचे आहे. अभिजित आणि रुपाली या दोघांसाठीही या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे अगदी भावनिक होऊन, रडत दोघेही या गोष्टीसाठी तयार झाल्यामुळे मैथिली व वीणा सध्याच्या आठवड्यासाठी सुरक्षित होतात.

त्यानंतर पुढच्या टास्कसाठी अभिजित-किशोरी आणि विद्याधर-सुरेखा अशा जोड्या निवडल्या जातात. या टास्कमध्ये दोन्ही जोड्यांना क्रॉस ड्रेसिंग (कमीत कमी 8 तासांसाठी) करायला सांगितले जाते. म्हणजेच अभिजित आणि विद्याधर यांना अनुक्रमे किशोरी व सुरेखा यांच्या वेशात वावरायचे आहे. सोबतच सांगितलेल्या गाण्यावर नृत्यदेखील करायचे आहे.

शेवटी दोन्ही जोड्या वेश बदलून आपल्या नृत्याने सर्वांचे मनोरंजन करतात. यामध्ये नऊवारी साडी नेसून विद्याधर यांनी सादर केलेली लावणी सर्वांनाच फार आवडते. टास्क पूर्णपणे यशस्वी पार पाडल्याने अभिजित, किशोरी, सुरेखा आणि विद्याधर या आठवड्यासाठी सुरक्षित होतात.

त्यानंतर टास्कसाठी रुपाली आणि पराग यांची जोडी निवडली जाते. या दोघांना वीणा व नेहा यांना मी या घरात राहण्यास पात्र नाही असे लिहिलेली पाटी गळ्यात अडकवून व डोक्यावर ‘अपात्र’ असे लिहून वावरण्यास तयार करायचे आहे. आता हा टास्क कसा पूर्ण होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.