Bambai Meri Jaan Trailer: क्राईम ड्रामा, बंबई मेरी जान सीरिजचा ट्रेलर आऊट, 'या' दिवशी होणार प्राइम व्हिडिओवर प्रीमियर

क्राईम ड्रामा बंबई मेरी जान मालिकेचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहत्यांनी ट्रेलर पाहून कौतुक केले आहे. मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे.

bambai meri jaan trailer,

Bambai Meri Jaan Trailer: प्राइम व्हिडिओने आगामी क्राईम ड्रामा, बंबई मेरी जान मालिकेचा ट्रेलर रिलीज केला आहे. ही 10 भागांची मालिका 14 सप्टेंबरपासून प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होईल. रितेश सिधवानी, कासिम जगमगिया आणि एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंटचे फरहान अख्तर निर्मित, एस. हुसैन झैदी यांच्या कथेसह, बंबई मेरी जानची निर्मिती रेन्सिल डिसिल्वा आणि शुजात सौदागर यांनी केली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन शुजात सौदागर यांनी केले आहे. या मालिकेसाठी चाहत्यांनी भरपुर उत्सुकता दाखवली आहे.

या मालिकेत के के मेनन, अविनाश तिवारी, कृतिका कामरा आणि निवेदिता भट्टाचार्य यांसारखे बहुमुखी आणि प्रतिभावान कलाकार आहेत. ही काल्पनिक गुन्हेगारी मालिका म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या बाप आणि मुलाची चित्तवेधक कथा आहे. स्वातंत्र्यानंतरच्या दिवसांवर आधारित, या कथेत दारा कादरी या तरुणाच्या जीवनाचा आणि उदयाचा मागोवा घेण्यात आला आहे.

ट्रेलर मधील डायलॉग ऐकताच, प्रेक्षकांच्या मनार छाप पडली आहे. या सीरीजता ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुरता वाढली आहे. 'बंबई मेरी जान'चा ग्लोबल प्रीमियर १४ सप्टेंबर रोजी प्राईम व्हिडीओवरवर होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement