Ashalata Wabgaonkar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

साता-यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 79 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Ashalata Wabgaonkar (Photo Credits: Faceook)

सोनी मराठी (Sony Marathi) वरील लोकप्रिय मालिका  'आई माझी काळुबाई' (Aai Majhi Kalubai) च्या सेटवर शूटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (Ashalata Wabgaonkar) यांच्यासह 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वा-यासारखी पसरली. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ज्येष्ठ अभिनेत्री आशालता ताई यांची प्रकृती चिंताजनक होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. साता-यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 79 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गेले चार दिवस आशालता वाबगावकर यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू होते. मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जवळपास 40 हून अधिक वर्षांसाठी त्या रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून काम करत होत्या. तसेच नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटर वर, आई माझी काळुबाई मालिकेच्या सेटवर 27 जणांंना कोरोनाची लागण

प्राप्त माहितीनुसार, 'आई माझी काळुबाई' मालिकेचे शुटींंग हे सातार्‍यात वाई जवळच्या एका फार्म हाउस वर सुरु आहे. अलिकडेच मालिकेत एका गाण्याच्या शुटींंग साठी मुंंबईवरुन एक डान्स ग्रुप इथे गेला होता या ग्रुप मुळेच व्हायरस पसरल्याची शक्यता मानली जातेय. दोन दिवसांपूर्वी आशालता यांंची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

'गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या 'अपने पराये'या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकनही मिळालं होतं. मराठी चित्रपट सृष्टीत 'उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी, गुपचूप गुपचूप' हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.