Asha Bhosle यांनी Choreographer Bosco Martis कडून घेतले Tauba Tauba Hook Step चे धडे; पहा 91 व्या वर्षीय गायिकेचा थक्क करणारा उत्साह (Watch Video)

बॉस्को मार्टिस ने आशा भोसले यांना 'तौबा तौबा' ची हूक स्टेप शिकवत त्यांच्याकडून आशिर्वादही घेतले.

Asha Bhosle With Bosco Martis | Instagram @Bosco Martis

गायिका आशा भोसले (Asha Bhosle) वयाच्या 91 व्या वर्षी देखील स्टेज वर करताना दाखवत असलेलं चैतन्य तरूण कलाकारांनाही लाजवणारं आहे. नुकतीच आशा भोसले यांनी दुबई मध्ये कॉन्सर्ट केली आहे. या कॉन्सर्ट मध्ये विकी कौशल प्रमाणे 'तौबा तौबा' (Tauba Tauba) वर थिरकत त्यांनी केलेलं सादरीकरणं तुफान वायरल झालं आहे. नेटकर्‍यांनी आशा भोसले यांच्या या कृतीचं कौतुक केले. दरम्यान Choreographer Bosco Martis ने आता खास व्हिडिओ शेअर करत आशा भोसले यांनी मोठ्या कौतुकाने या गाण्याची हूक स्टेप कशी केली? याची विचारणा करून ती स्वतः शिकून केल्याचा क्षण शेअर केला आहे.

choreographer Bosco Martis डिसेंबर महिन्यात आशा भोसलेंना त्यांच्या मुंबई मधील घरी भेटायला गेला होता. यावेळी त्याने आशा भोसलेंना ही 'तौबा तौबा' ची हूक स्टेप देखील दाखवली होती. Asha Bhosle Performs Gulabi Sadi Song: आशा भोसले यांनाही पडली संजू राठोड च्या सुपरहिट 'गुलाबी साडी...' गाण्याची भूरळ; 91 व्या वर्षी दुबईत लाईव्ह शो मध्ये गायलं (Watch Video) .

Bosco Martis कडून आशा भोसले शिकल्या हुक स्टेप

 

View this post on Instagram

 

A post shared by Bosco Martis (@boscomartis)

आशा भोसलेंचा स्टेज वरील परफॉर्मन्स

View this post on Instagram

A post shared by Dharma Productions (@dharmamovies)

डिसेंबर 2024 मध्ये, Bad Newz सिनेमाची निर्मिती करणाऱ्या धर्मा प्रॉडक्शनने आशा भोसले यांच्या मैफिलीदरम्यान 'तौबा तौबा'ची हुक स्टेप करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यांनी त्याला कॅप्शन दिले, "2024 saved the best for last! Asha Bhosle ji bringing her charm to #TaubaTauba and blessing us for an incredible 2025! असं कॅप्शन दिलं होतं. ज्यामध्ये त्यांनी आशा भोसलेंनी स्वतः च्या चार्म ने 'तौबा तौबा' करत 2024 चा शेवट मस्त केला आहे. असं म्हटलं होतं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now