Guilty Minds Trailer: अमेझॉन ओरिजनल सिरीज ‘Guilty Minds'चा ट्रेलर प्रदर्शित, श्रिया पिळगांवकर आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत

परितोष बासू यांनी सूत्रसंचालन केले.

Guilty Minds Trailer (Photo Credit - Instagram)

प्राईम व्हिडिओच्यावतीने (Prime Video) शुक्रवारी कायद्यावर आधारित आगामी कलाकृती, अमेझॉन ओरिजनल सिरीज गिल्टी माईंड्सच्या (Guilty Minds Trailer) ट्रेलरचे प्रकाशन करण्यात आले, यामध्ये श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) आणि वरूण मित्रा (Varun Mitra) मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत. या कलाकृतीची निर्मिती आणि दिग्दर्शन शेफाली भूषणने केले असून जयंत दिगंबर सोमाळकर सह-दिग्दर्शक आहे. दोन तरूण आणि महत्त्वाकांक्षी वकिलांचा प्रवास या नाट्यातून उलगडतो. यातील एक व्यक्ति म्हणजे सदाचाराचे प्रतीक तर दुसरी व्यक्ति अग्रगण्य लॉ फर्ममध्ये कार्यरत असते, या व्यक्तिरेखेला अनेक ‘ग्रे शेड्स’ आहेत. या मालिकेत नम्रता शेठ, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा, सतीश कौशिक, बेंजामिन गिलानी, विरेन्द्र शर्मा, दीक्षा जुनेजा, प्रणय पचौरी, दीपक कालरा आणि चित्रांगदा सतरूपा यासारखे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्याचप्रमाणे करिश्मा तन्ना, शक्ति कपूर, सुचित्रा कृष्णमूर्ती, गिरीश कुलकर्णी आणि सानंद वर्मा हे अभिनेते मुख्य भूमिकेत आणि पाहुणे कलाकार म्हणून दिसतील.

मुंबईमधील प्रतिष्ठीत महाविद्यालयात, संस्थेचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, यावेळी सहभागी सदस्य चर्चेत वकील मोनिका दत्ता, रवींद्र सूर्यवंशी, निर्माती आणि दिग्दर्शक शेफाली भूषण, कलाकार श्रिया पिळगांवकर आणि वरूण मित्रा सामील झाले तसेच वरिष्ठ प्राध्यापक आणि अध्यक्ष, एमबीए लॉ, एनएमआयएमएस डॉ. परितोष बासू यांनी सूत्रसंचालन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

कायदा व्यवस्थेवर  वास्तववादी कलाकृती

“माझ्याकरिता गिल्टी माईंड्स केवळ नाट्यमालिका नसून त्यापेक्षा अधिक आहे. न्यायासाठी झगडणारे दोन सशक्त वकील आणि त्यांच्या अशीलांची ही कथा आहे. माझ्या कुटुंबाकडून कायद्याविषयीची जी शिकवण मला मिळाली, त्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. माझ्या घरी रात्रीच्या जेवणादरम्यान कायदा हा विषय चर्चेत केंद्रस्थानी असे, त्यात वातावरणात मी लहानाची मोठी झाले. मलाही कायम याच विषयाचे कुतूहल वाटत आले. कायदा व्यवस्थेवर एखादी वास्तववादी कलाकृती करण्याची इच्छा मनोमन होती. विविध केसच्या शोध घेत गिल्टी माईंड्सने आकार घेतला”, असे गिल्टी माईंड्सची निर्माती आणि दिग्दर्शिका शेफाली भूषण म्हणाली. (हे देखील वाचा: अखेर ठरलं! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात; तीन दिवस चालणार लग्नाचे कार्यक्रम)

“ही नाट्यमालिका करण्यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडिओपेक्षा दुसरा कोणताही सहयोगी सापडला नसता. ही कलाकृती जगभरातील प्रेक्षकांना पाहता येईल. ही नाट्यकृती तयार करताना जितकी मजा आली, तितकीच ती प्रेक्षकांना आवडेल ही आशा वाटते. ”जयंत दिगंबर सोमाळकर सह-दिग्दर्शित आणि करण ग्रोव्हर, अंतरा बॅनर्जी व नावेद फारूकी प्रस्तुत गिल्टी माईंड्सचे विशेष स्ट्रीम 22 एप्रिल 2022 पासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर करण्यात येणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif