Allu Arjun's Fan Attempts Suicide : अल्लू अर्जुनच्या चाहत्याचा कारनामा; जेलमधून सुटकेसाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतले (Watch Video)

व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनचा फॅन त्याच्या सुटकेसाठी आत्महत्या करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Photo Credit- X

Allu Arjun's Fan Attempts Suicide: अभिनेता अल्लू अर्जुनने चाहत्यांच्या मनांवर इतके अधिराज्य गाजवले आहे की, त्याच्या अटकेनंतर (Allu Arjun Arrest) चंचलगुडा तुरुंगाबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. अभिनेत्याला अटक करण्यात आली आणि एक दिवसानंतर सोडण्यात(Allu Arjun Released) आले. अल्लू अर्जुनच्या सुटकेनंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनचा फॅन त्याच्या सुटकेसाठी आत्महत्या करत असल्याचा(Allu Arjun Fan Suicide Attempt) दावा करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री चंचलगुडा तुरुंगाबाहेर ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. पुष्पा चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान संध्या थिएटरमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. त्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. काही तासांतच तेलंगणा उच्च न्यायालयाने अभिनेत्याला जामीन मंजूर केला होता. जामीन मिळूनही कागदोपत्री दिरंगाईमुळे त्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली.

पोस्ट

त्या दरम्यानच, अल्लू अर्जुन तुरुंगात असताना चाहत्याने अभिनेत्याची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली. चाहत्याने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चाहत्याला ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.