Ajinkya Deo Birthday: मराठी चित्रपट ते हॉलिवूडपर्यंतचा पल्ला गाठणारे अभिनेते अजिंक्य देव यांच्याबद्दल काही खास गोष्टी
केवळ अभिनयच नव्हे तर त्यांच्या देखण्या व्यक्तीमत्वाचीही त्यांनी प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. अशा या दिमाखदार व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्याविषयी काही खास गोष्टी
Ajinkya Deo 58th Birthday: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते अजिंक्य देव यांचा आज 58 वा वाढदिवस... अजिंक्य देव यांचा जन्म 3 मे 1963 रोजी झाला. अतिशय हुशार, हरहुन्नरी असे कलाकार... दिमाखदार व्यक्तिमत्व, आवाजातील ठेहराव ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू. अभिनयाचा वारसा लाभलेल्या अजिंक्य देव (Ajinkya Deo) हे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि अजिंक्य देव यांचे पुत्र. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी 'अर्धांगी' या मराठी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मराठी चित्रपटापासून ते हॉलिवूडपर्यंत त्यांनी मजल मारली. त्यांचा हा प्रवास वाखाकण्याजोगा आहे.
मराठीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. केवळ अभिनयच नव्हे तर त्यांच्या देखण्या व्यक्तीमत्वाचीही त्यांनी प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. अशा या दिमाखदार व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्याविषयी काही खास गोष्टी... हेदेखील वाचा- Aamir Khan च्या '3 इडियट्स' चित्रपटात Kareena Kapoor ने केलेल्या भूमिकेसाठी Anushka Sharma ने दिली होती ऑडिशन; वाढदिवसानिमित्त पहा अभिनेत्रीचा Unseen Video
- अजिंक्य देव यांचा 1987 साली आलेल्या 'सर्जा' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
- याच वर्षी त्यांनी 'संसार' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या दीराची भूमिका साकारली होती.
- 1996 साली 'The Peacock Spring' या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2019 मध्ये 'The Warrior Queen of Jhansi' या हॉलिवूडपटात तात्या टोपेची भूमिका साकारली होती.
- बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून धुमाकूळ घातलेल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटातील अजिंक्य देव यांच्या भूमिकेचे कौतुक झाले.
- अजिंक्य देव यांना राजस्थानी पद्धतीचे पदार्थ खूप पसंत आहे.
- भारताबाहेर फिरण्यासाठी फ्रान्स आणि लंडन ही त्यांची आवडीची शहरे आहेत.
- अजिंक्य देव यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.
अजिंक्य देव यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातून, मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास वाखाखण्याजोगा आहे. अभिनयाचा वारसा लाभून सुद्धा ते सिनेसृष्टीत म्हणावे तितके पुढे येऊ शकले नाही. मात्र त्यांनी जी कामे केली त्यात आपले 100% देऊन लोकांमध्ये स्वत:ची ओळख मात्र नक्की निर्माण केली. अशा या हरहुन्नरी कलाकाराला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!