 
                                                                 Tere Ishk Mein: 'तेरे इश्क में' चित्रपटाचा आणखी एक टीझर समोर आला आहे. ज्यात क्रिती सेनन दिसत आहे. टीझरमध्ये क्रिती सेननचा आवाज आहे. ती प्रेमाविषयी बोलताना दिसत आहे. तसच तिच्या आजूबाजूचा परिसर आगीत जळताना दिसत आहे. टीझरमध्ये शेवटी ती तिच्या अंगावत पेट्रोल ओतून आग लावण्याच्या प्रयत्नान असल्याच दाखवलं आहे. या चित्रपटात धनुषसोबत (Dhanush) क्रिती रोमान्स (Kriti Sanon) करताना दिसणार आहेत. साऊथ स्टार धनुषने आत्तापर्यंत सोनम कपूर आणि सारा अली खानसोबत काम केले आहे. दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली होती.
अलिकडेच, दिग्दर्शक आनंद एल राय आणि तेरे इश्क में च्या निर्मात्यांनी आगामी रोमँटिक ड्रामाचा दुसरा टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये कृती सॅननचा चेहरा दिसत आहे. या टीझरमध्ये, क्रिती दंगलीत दिसत आहे आणि ती पुढे जात असताना, तिच्यावर पेट्रोल टाकताना दिसते. नंतर ती सिगारेट पेटवते आणि हा टीझर संपतो.
तेरे इश्क में हा चित्रपट गुलशन कुमार, टी-सीरीज आणि कलर येलो यांचा आहे. तर भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा यांच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
View this post on Instagram
कृतीने इंस्टाग्रामवर 'तेरे इश्क में' चित्रपटाचा टीझर शेअर केला आणि लिहिले, 'काही प्रेमकथा आगीतून बाहेर पडण्यासाठी असतात. याचा पुरावा म्हणजे शंकर आणि मुक्ती...'. हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
