Seema Deo Health Update: Alzheimer शी लढत असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारासाठी लेक अजिंक्य देव यांनी केलं चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन; जाणून घ्या नेमका हा आजार काय?

अभिनेत्री सीमा देव सध्या अल्झायमर या आजाराने त्रस्त आहेत. अभिनेता अजिंक्य देव यांनी आज सकाळी सीमा देव यांच्या आजारपणाबद्दल माहिती देत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे

Seema Deo and Ajinkya Deo| Photo Credits: Twitter and Wikipedia

मराठी सोबतच हिंदी सिनेमा गाजवणार्‍या अभिनेत्री सीमा देव सध्या अल्झायमर (Alzheimer) या आजाराने त्रस्त आहेत. सीमा देव  (Seema Deo) यांचा लेक आणि अभिनेता अजिंक्य देव (Ajinkkya R Deo) यांनी आज सकाळी सीमा देव यांच्या आजारपणाबद्दल माहिती देत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. 'देव कुटुंब तिच्यासाठी प्रार्थना करत आहे. पण तिच्यावर प्रेम केलेल्या महाराष्ट्राला मी आवाहन करतो की तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करा' असं भावनिक ट्वीट अजिंक्य देव यांनी करत पहिल्यांदाच आईच्या आजारपणाची माहिती दिली आहे.

सीमा देव-रमेश देव या जोडीला महाराष्ट्राने मराठी सोबतच हिंदी सिनेमांमध्येही प्रेम दिले आहे. ‘जगाच्या पाठीवर’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘मोलकरीण’, ‘पडछाया’, ‘अपराध’सारखे दर्जेदार मराठी तर आनंद, बेनाम बादशा, सारखे हिंदी सिनेमे देखील केले आहेत. दरम्यान वयाच्या 78 व्य वर्षीदेखील त्या विविध प्रोजेक्ट्समधून रसिकांसमोर येत होत्या. सिनेमा जगतातील अनेक कार्यक्रमांना रमेश देव- सीमा देव ही जोडी उपस्थिती लावत होती. अभिनेत्री सीमा देव यांनी राजा परांजपे दिग्दर्शित जगाच्या पाठीवर या सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि पुढे त्यांच्या करियरचा आलेख चढता राहिला.

अजिंक्य देव ट्वीट

Alzheimer आजार नेमका काय? तो जीवघेणा आहे का?

ब्रेन सेलचं नुकसान झाल्याने त्यांचा इतरांशी असलेला समन्वय बिघडत जातो. यामध्ये विस्मरणापासून अनेक मेंटल फंशन्सचा समावेश आहे. गोष्टी लक्षात न राहणं, गोंधळ होणं ही सुरूवातीची लक्षणं आहेत. अल्झायमर आजारामध्ये तो पूर्ण ठीक करण्याची औषधं नाहीत. पण वेळीच हा आजार लक्षात आल्यास तात्पुरती त्यांच्या लक्षणांमध्ये सुधारणा करता येऊ शकते. जॉर्ज फर्नांडिस दीर्घकाळापासून होते 'अल्जाइमर'ने ग्रस्त; नेमकी काय आहेत याची लक्षणे, कारणे आणि बचावात्मक उपाय?

Alzheimer आजारामुळे मृत्यू होत नाही तर या आजारात मेंदूसोबत असलेलं नर्व्ह कनेक्शन कमकुवत होत जातं. जसजसा त्रास वाढत जातो तशा लहान सहान गोष्टी देखील कठीण होतात. यामध्ये चालणं, फिरणं कमी होतं, खाणं, अन्नपदार्थ गिळणं कठीण होतं. हा आजार मेंदूची कार्यक्षमता कमी करत जातं त्यामुळे आरोग्यावर, इतर अवयवांवर परिणाम होतो. मेंदूचं कार्य बिघडल्याने मृत्यू होऊ शकतो. अनुवंशिकता, नैराश्य, डोक्याला मार लागणे, उच्च रक्तदाब आणि स्थुलता यामुळे हा आजार जडू शकतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now