Kiran Mane Post: 'तुमच्या बुडाखाली भयंकर अपराध घडत आहेत, सोडा खुर्ची', वसईत तरुणीच्या हत्येप्रकरणावरून किरण मानेंची संतप्त पोस्ट

वसईतील घटनेवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरत त्यांच्या जाहीनाम्याची मागणी केली आहे.

Kiran Mane | (Photo Credits: Facebook)

Kiran Mane Post: मराठी अभिनेते किरण माने राजकीय, सामाजिक विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत त्यांची मते मांडत असतात. 18 जून रोजी वसईत एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची भरदिवसा हत्या (Vasai Murder Case)केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच किरण माने( Kiran Mane) यांनी पोस्ट करत तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. रोहित यादव (29) असे आरोपीचे नाव आहे. त्या दोघांमध्ये काही कारणांनी वाद झाले होते. याच भांडणातून रोहितने आरतीला ऑफिसला जाताना अडवलं आणि रागत त्याने आरतीची हत्या केली. (हेही वाचा: Vasai Murder Case: ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रेयसीची निर्घृण हत्या, वसईतील थरकाप उडवणारी घटना)

पोस्ट पाहा-

किरण माने यांनी पोस्ट शेअर करत, 'वसईमधील तरुणीच्या हत्येचा व्हिडिओ पाहून काळीज अगदी पिळवटून गेलं. याआधी तरुणीने पोलिसात तक्रार केली होती. गृहमंत्री महोदय, आतातरी राजीनामा द्या. तुम्ही जेव्हा विरोधी पक्षनेते होता तेव्हा कोरोनाकाळात सुशांतसिंग राजपूतसाठी घसा खरवडून ओरडत होता. तुमच्या बुडाखाली त्याहूनही भयंकर अपघात रोज घडत आहेत. सोडा खुर्ची. लायक माणसाला बसवा तिथे', असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif