Aamir Khan Birthday Special: बॉलिवूडमध्ये वेगळी छाप सोडणारे आमिर खान याचे सुपरहिट सिनेमे!

गोंडस चेहरा, सहज सुंदर अभिनय आणि अभ्यासू वृत्ती यामुळे त्याने मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.आमिरचे सर्वच सिनेमे सुंदर असले तरी काही सिनेमांमधील आमिरची भूमिका अधिक लक्षात राहण्यासारखी आहेत.

Aamir Khan Birthday Special (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा आज 55 वा वाढदिवस आहे. तब्बल 32 वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या आमिर खानने एकूण 40 सिनेमात काम केले आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्याने 'होली' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यापूर्वी त्याने 1973 मध्ये 'यादों की बारात' आणि 1974 मध्ये 'मदहोश' या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले होते. होली सिनेमानंतर 'कयामत से कयामत तक', 'दिल' यांसारख्या रोमँटिक सिनेमांची रांगच लागली. आमिर याच्या सर्वच सिनेमांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. गोंडस चेहरा, सहज सुंदर अभिनय आणि अभ्यासू वृत्ती यामुळे त्याने मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.

आमिरचे सर्वच सिनेमे सुंदर असले तरी काही सिनेमांमधील आमिरची भूमिका अधिक लक्षात राहण्यासारखी आहेत. तसंच लगान, रंग दे बसंती, तारे जमीं पर, दंगल या आमिरच्या सिनेमांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे. ('व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी आमिर खानने व्यक्त केली करिना कपूरसोबत रोमान्स करण्याची इच्छा)

लगान:

2001 मध्ये प्रदर्शित झालेला लगान हा सिनेमा पूर्वी शाहरुख खानला ऑफर झाला होता. मात्र त्याने तो नाकारल्याने सिनेमा आमिर खानला ऑफर करण्यात आला आणि त्याने त्या संधीच सोनं केलं.

रंग दे बसंती

क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या कारकर्दीच्या पार्श्वभूमीवर 'रंग दे बसंती' या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

तारे जमीं पर

Dyslexia या दुर्मिळ आजारावर भाष्य करणारा 'तारे जमीं पर' या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. यात आमिर याने साकारलेली भूमिका अत्यंत लक्षवेधी ठरली.

गजनी

साऊथ सिनेमाचा रिमेक असलेल्या 'गजनी' या सिनेमाने short-term memory loss हा आजार आणि त्यात अडकलेला व्यावसायिक याची कथा मांडली.

3 इडिड्स

आमिरच्या आवडत्या सिनेमांपैकी एक म्हणून या सिनेमाकडे पाहिले जाते. या सिनेमात विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती, पालकांच्या अपेक्षा यावर भाष्य केले आहे.

दंगल

महावीर सिंग फोगाट या कुस्तीपटूच्या जीवनपट या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळतो.

मिस्टर परेफेक्शनिस्ट आमिर खान सध्या 'लाल सिंग चड्डा' या सिनेमामध्ये व्यस्त असून हा सिनेमा Tom Hanks' Forrest Gump या सिनेमाचा रिमेक असणार आहे. या सिनेमात आमिर खान सह करिना कपूर खान प्रमुख भूमिकेत आहे. डिसेंबर 2020 पर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.