Roop Nagar Ke Cheetey: एका मैत्रीची अनोखी गोष्ट, ‘रूप नगर के चीते’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
चिखलात माखलेले, कशाचीही पर्वा न करता, आपल्याच मस्तीत असलेले दोन जिगरी दोस्त आपल्याला त्यात दिसताहेत. ते कोण आहेत? त्याची ओळख लवकरच होणार आहे.
कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे ‘मैत्री’. रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात. मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट एका मराठी चित्रपटातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नाव आहे ... 'रूप नगर के चीते'! (Roop Nagar Ke Cheetey) नाव जरी हिंदी असलं, तरी चित्रपट मात्र मराठी आहे. येत्या 16 सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' आपल्या भेटीला येतील. त्यापूर्वी या चित्रपटाचं एक धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. चिखलात माखलेले, कशाचीही पर्वा न करता, आपल्याच मस्तीत असलेले दोन जिगरी दोस्त आपल्याला त्यात दिसताहेत. ते कोण आहेत? त्याची ओळख लवकरच होणार आहे. एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली बॉलीवूड मधील संगीतकार मनन शाह यांनी 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून, अतिशय भव्य दिव्य पद्धतीने दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी हा चित्रपट साकारला आहे.
सध्याच्या जगात मैत्रीची व्याख्या जरी तीच असली तरी तीचं स्वरुप बदलताना दिसतंय. या चित्रपटातूनही मैत्रीमधला वेगळा विचार आपल्या समोर येणार आहे. दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत. चित्रपटातील कलाकार आणि इतर तपशीलांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. (हे देखील वाचा: ZolZaal Marathi Movie: 'झोलझाल' चित्रपटातील विनोदी भूमिकेतून अभिनेता अमोल कागणे येतोय रसिक प्रेक्षकांच्या भेटीला)
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह यांनी एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या 'स्कूल, कॅालेज आणि लाईफ' या आगामी पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे विहान सूर्यवंशी हे 'रूप नगर के चीते'चं दिग्दर्शन करत आहेत.