Grammys 2025 मध्ये 'In Memoriam' विभागात तबला वादक Zakir Hussain यांचा नाव नसल्याने भारतीय संगीतप्रेमी नाखूश
मागील वर्षी ग्रॅमी अवॉर्ड्स मध्ये त्यांनी एकाच रात्री 3 पुरस्कार मिळवत इतिहास रचला होता.
भारतीय तबला वादक आणि चार वेळा ग्रॅमी विजेते झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांचा आज 67 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात In Memoriam segment मध्ये उल्लेख न करणं भारतीय संगीतप्रेमींना खटकलं आहे. Recording Academy च्या या दुर्लक्ष केल्या च्या बाबी बद्दल नाराजी बोलून दाखवण्यात आली आहे. सोशल मीडीयांत याबद्दल अनेकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
अमेरिकेत डिसेंबर 2024 मध्ये वयाच्या 73 व्या वर्षी झाकीर हुसेन यांनी अखेरचा श्वास घेतला. लॉस एंजेलिसमधील Crypto.com एरिना येथे रविवारी प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा झाला, जेथे वार्षिक Memoriam montage ने दिवंगत प्रतिष्ठीत कलाकारांना, मान्यवरांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, हुसेनचा यांचा त्यामध्ये कोणत्याच विभागात समावेश करण्यात आला नाही. Grammy Awards 2025: भारतीय-अमेरिकन संगीतकार Chandrika Tandon यांना 'त्रिवेणी' अल्बमसाठी प्राप्त झाला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार (Video) .
झाकीर हुसेन यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने भारतीय संगीतप्रेमी नाखूष
दरम्यान एकाच अवॉर्ड नाईट्स मध्ये 3 ग्रॅमी जिंकणारे झाकीर हुसेन हे मागील वर्षीचे पहिलेच भारतीय कलाकार होते. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत, झाकीर हुसेन यांनी अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कलाकारांसोबत काम केले, परंतु इंग्रजी गिटारवादक John McLaughlin, व्हायोलिन वादक एल शंकर आणि percussionist TH 'Vikku' Vinayakram यांच्यासोबतच एकत्र येऊन भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य जॅझ संगीत एकत्र आणले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)