कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात उद्यापासून 21 दिवस लॉकडाउन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला श्रेया घोषाल, तापसी पन्नू, रेणुका शहाणे यांचा पाठिंबा

या घोषणेनुसार आज रात्री 12 वाजेपासून संपूर्ण देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन होत आहे. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे देशातील जनतेला संबोधित केले.

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी देशभरात लॉकडाऊन (India Lockdown) करत असल्याची मोठी घोषणा केली. या घोषणेनुसार आज रात्री 12 वाजेपासून संपूर्ण देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन होत आहे. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे देशातील जनतेला संबोधित केले. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाला श्रेया घोषाल (Shreya Ghoshal), तापसी पन्नू (Tapasi Pannu), रेणुका शहाणे (Renuka Shahane), यांनी ट्विटरच्या माध्यमातून 21 दिवस लॉकडाउनला पाठिंबा दिला आहे. कोरोना हा आगीसारखा हा पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी ही घोषणा केली आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीने लागू केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातला आहे. कोरोना व्हायरस आता भारतातही दाखल झाला असून आतापर्यंत 500 हून अधिकजण कोरोनाच्या विळख्यात अकडले आहेत. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. परंतु, कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत केले आहे. दरम्यान मोदी म्हणाले की, ‘जनता कर्फ्यूने दाखवून दिले की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवले आहे. त्या राष्ट्रांकडे साधन नाहीत, असे नाही. पण, हा आजार इतक्या वेगाने पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे', अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. हे देखील वाचा-Coronavirus: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; संपूर्ण भारतात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर, पीएम नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा

श्रेया घोषाल यांचे ट्वीट-

तापसी पन्न यांचे ट्वीट-

रेणुका शहाणे यांचे ट्वीट-

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "करोनामुळे देशासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्याने होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. आगीसारखा हा आजार पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे एकमेकांपासून दूर राहणे आणि घरातच राहणे. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी आज मी इथे मोठी घोषणा करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif