Mumbai Comic Con 2025: मुंबईतील कॉमिक कॉनमध्‍ये यामाहा एक्‍स्‍पेरिअन्‍स झोन इव्हेंटने घातली उत्‍साहवर्धक भर; लोकांनी घेतला व्‍हर्च्‍युअल रेसिंगचा अनुभव

सतत धावपळ होत असलेल्‍या शहरामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या या इव्‍हेण्‍टमध्‍ये मुंबईचा संपन्‍न सांस्‍कृतिक वारसा, डायनॅमिक ऑटोमोटिव्‍ह सीन आणि उत्कट चाहत्‍यांचा समुदाय पाहायला मिळाला.

Yamaha Experience Zone event

Mumbai Comic Con 2025: इंडिया यामाहा मोटर प्रा. लि.ने जिओ कन्‍वेंशन सेंटर, बीकेसी, मुंबई येथे 12 व 13 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्‍यात आलेला भारतातील सर्वात मोठा पॉप कल्‍चर इव्‍हेण्‍ट कॉमिक कॉनमध्‍ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सतत धावपळ होत असलेल्‍या शहरामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या या इव्‍हेण्‍टमध्‍ये मुंबईचा संपन्‍न सांस्‍कृतिक वारसा, डायनॅमिक ऑटोमोटिव्‍ह सीन आणि उत्कट चाहत्‍यांचा समुदाय पाहायला मिळाला. उत्‍साही वीकेण्‍डसाठी हा इव्‍हेण्‍ट अगदी योग्‍य ठरला, जेथे कला, जीवनशैली व इनोव्‍हेशन क्‍लासिक सिटी फॅशनमध्‍ये एकत्र पाहायला मिळाले.

यामाहा एक्‍स्‍पेरिअन्‍स झोन इव्‍हेण्‍ट -

कॉमिक कॉन इव्हेटमध्ये यामाहा एक्‍स्‍पेरिअन्‍स झोन इव्‍हेण्‍टमध्‍ये खास आकर्षण ठरले, जेथे सर्वोत्तम सहभागात्‍मक अॅक्टिव्हिटीजनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. उच्‍च-स्‍तरीय मोटोजीपी गेमिंग क्षेत्राने देखील उत्‍साहींचे लक्ष वेधून घेतले, जेथे त्‍यांना व्‍हर्च्‍युअल रेसिंगच्‍या अॅड्रेनालाइनचा अनुभव मिळाला.

दरम्यान, समुराई-प्रेरित एमटी-03 झोन व्हिज्‍युअली लक्षवेधक फोटो बॅकड्रॉप ठरले, तर वायझेडएफ-आर15 ने अभ्‍यागतांना ड्रॅमॅटिक लीन अँगलमध्‍ये पोझ देत फोटो काढण्‍याचा अद्वितीय आनंद दिला, जेथे रेसट्रॅक कॉर्नरवरील रेसिंगचा अनुभव मिळाला. या परस्‍परसंवादी उत्‍साहामध्‍ये अधिक भर करत रेझेडआर स्‍ट्रीट रॅलीमध्‍ये रिअल-टाइम फोटो शेअरिंगचा समावेश होता, जेथे अभ्‍यागत अद्वितीय अनुभवामध्‍ये सामावून गेले आणि सर्वात संस्‍मरणीय क्षणांची आठवण सोबत घेऊन गेले.

या इव्‍हेण्‍टमध्‍ये उपस्थितांनी मोटरसायकलिंग व यामाहाच्‍या वारसाप्रती प्रबळ आवड दाखवली. या उत्‍साही सहभागाला प्रतिसाद देत यामाहाने सर्वात डायनॅमिक कॉसप्‍लेयर्स, कॉमिक्‍स व दुचाकी संस्‍कृतीचे उत्‍कट चाहते यांना विशेष कॉमिक कॉन थीम्‍ड मर्चंडाइज आणि प्रीमियम यामाहा कलेक्टिबल्‍स दिले. शहरातील उत्‍साही ऊर्जा व वर्दळीदरम्‍यान मुंबई कॉमिक कॉन 2025 ची सांगता होत असताना यामाहा भारतातील तरूणांशी संलग्‍न होणारे नाविन्‍यपूर्ण अनुभव डिझाइन करण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे.

तथापी, कॉमिक कॉन सारखे इव्‍हेण्‍ट्स प्रीमियम व डायनॅमिक मोटरसायकल ब्रँड म्‍हणून यामाहाच्‍या पोझीशनला दाखवण्‍याची संधी देतात. यामाहा व्‍यक्‍तींना प्रेरित करण्‍यासोबत त्‍यांच्‍याशी संलग्‍न होण्‍याप्रती, भावी पिढ्यांसाठी दीर्घकालीन उत्‍साहींच्‍या समुदायाला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement