2019 मध्ये लॉन्च होणाऱ्या शानदार कार; लॅंड रोवर, Tata Harrier,Mahindra S201, Tata 45X

आपल्यापैकी अनेक जण उत्सुक असतील नव्या वर्षात एखादी शानदार कार आपल्या घरी आणावी म्हणून. या मंडळींनी 2019या नव्या वर्षात कोणकोणत्या कार लॉन्च होणार आहेत, हे पाहायलादेखील सुरुवात केली असेल. म्हणूनच आम्ही येथे काही कारबाबत आपल्याला सूचवू इच्छितो. ज्या कार 2019मध्ये लॉन्च होणार आहेत.

2019मध्ये भारतात लॉन्च होणाऱ्या कार (Archived, edited and representative images)

Upcoming SUVs In India In 2019: 2018 या सरत्या वर्षाला निरोप देताना 2019चे स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक झाला असाल नक्कीच. पण, आपल्यापैकी अनेक जण उत्सुक असतील नव्या वर्षात एखादी शानदार कार आपल्या घरी आणावी म्हणून. या मंडळींनी 2019या नव्या वर्षात कोणकोणत्या कार लॉन्च होणार आहेत, हे पाहायलादेखील सुरुवात केली असेल. पण, फार टेन्शन घेऊ नका. या कामात आम्ही आपल्याला काहीशी मदत करु शकतो. म्हणूनच आम्ही येथे काही कारबाबत आपल्याला सूचवू इच्छितो. ज्या कार 2019मध्ये लॉन्च होणार आहेत, अशी चर्चा आहे. जाणून घ्या कारबाबत आणि त्यांच्या फिचर्सबाबतही.

Tata Harrier

जर तुम्हाला लॅंड रोवर कार आवडत असेल तर, तुमच्यासाठी टाटाची Tata Harrierही कार नक्कीच छान वाटू शकते. या कारमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला लॅंड रोवर कारसारख्या भेटू शकतात. कारण या कारचे डिझाईन लॅंड रोवरच्या इंजिनिअरने केली आहे. Harrierमध्ये असलेले इंजिन 14ps पॉवर जनरेट करते. कारमध्ये ६ स्पीड मॅन्यूअल आणि ऑटेमॅटीक असतील. ही कार 2019च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Mahindra S201

महिंद्रा कंपनी 2019मध्ये आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणण्याची तयारी करत आहे. ही कार Alturas G4सारखी असू शकते. यात फ्रंड आणि रिअर बंपरसोबत हेडलॅंम्प आणि फॉग लॅंम्प नव्या लूकमध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. सोबतच एलॉय व्हील आणि एलईडी ट्रेल लँपमध्येही काही नवे असेन. यात १.२ लीटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर डीजेल इंजिन असू शकते. ही कार मारुती सुझुकीच्या विटारा ब्रेजाला टक्कर देण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेबाबत विचार करायचा तर ही कार ड्युअल एअरबॅग एबीएस आणि इबीडीयुक्त असेल.

Tata 45X

टाटाने आपली प्रीमियम हिचबॅगबाबत असलेली उत्सुकता 2018मध्येच काहीशी पूर्ण केली आहे. मात्र, या कारचे प्रॉडोक्शन मॉडेल 2019मध्ये सादर केले जाऊ शकते. या कारची ओव्हरऑल लेंग्थ 4 मीटर असेल. इंटेरिअरमध्येही बरेच बदल पाहायला मिळू शकतात. यात BSVIइमीशन नार्म्स चे इंजिन असेन, जे 1.2लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर टर्बोचार्ज डीजल इंजिनमध्ये होईल. कार मध्ये मॅन्यूअल आणि ऑटेमॅटीक गिअरबॉक्सही असतील.  (हेही वाचा, कार खरेदी करताय? मग डील करताना या गोष्टींची माहिती हवीच..)

Nissan Kicks

Nissan आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kicks 2019मध्ये लोन्च करत आहे. ही कार Renault Dusterच्या धर्तीवर आधारलेली असेन. तसेच, डिजाईनही अत्यंत हटके असू शकते. कारच्या फ्रंटला एलईडी प्रोजेक्टकर हेडलॅम्प आणि एलइडी फॉग लॅम्प असेन तसेच, 17 इंचांचा एलॉय व्हीलही असेन. सोबत इतरही अनेक फिचर्स असतील. Kick मध्ये 1.5 लीटर डीजल आणि पेट्रोल इंजिन असेन. जे अॅटोमॅटीक आणि मॅन्यूअलमध्ये असेन. (हेही वाचा, December 2018 Calendar : हे आहेत डिसेंबर महिन्यात साजरे होणारे सण आणि उत्सव)

Kia

Kia भारतात आपली पहिले मॉडेल लॉन्च करत आहे. जे 2019मध्ये ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. ही कार Hyundai Creta च्या धर्तीवर बनल्याचे सांगितले जाते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now