TVS Motor कंपनीने आपली लोकप्रिय बाइक Apache RR 310 च्या किंमतीत पुन्हा केली वाढ, जाणून घ्या नवे दर
कंपनीने या बाईकच्या किंमतीत सलग तीनदा वाढ केली आहे.
TVS Motor कंपनीने भारतीय बाजारात आपली एकाहून एक जबरदस्त अशा बाईक्स आणून चाहत्यांना अक्षरश: वेडं लावले. बदलत्या काळानुसार, आपल्या बाइकचे लूक्स आणि डिझाईनवर जास्त भर दिल्याने ग्राहक देखील आपोआप या बाइक्सकडे वळू लागले. त्यातीलच एक लोकप्रिय बाइक म्हणजे Apache RR 310...या बाईकची तरुणांमध्ये प्रचंड क्रेज आहे. ही गोष्ट लक्षात कंपनीने या बाइकच्या किंमतीत पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे या Apache च्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या बाईकच्या किंमतीत 2000 रुपयांनी वाढ केली आहे. कंपनीने या बाईकच्या किंमतीत सलग तीनदा वाढ केली आहे.
Apache RR 310 बाइक जानेवारी 2020 मध्ये लाँच केली होती. तेव्हा या बाईकची किंमत 2,40,000 इतकी होती. त्यानंतर जुलै 2020 मध्ये कंपनीने या बाईकची किंमत 2.45 लाख रुपये इतकी केली. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये याची किंमत 2.48 लाख रुपये इतकी केली. आता त्यामध्ये 2 हजार रुपयांची वाढ करुन आता या बाईकची किंमत 2,49,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.हेदेखील वाचा- भारतात सर्वाधिक फास्ट इलेक्ट्रिक बाइक लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 150km
या बाईकला BS6 इंजिनसह लाँच करण्यात आले होते. या बाईकमध्ये BS6 कम्पलाइंट, 312.2cc चे इंजिन आहे. जे 9700rpm वर 34hp पॉवर आणि 7,700 rpm वर 27.3 Nm टॉर्क जेनरेट करतो. यात इंजिन स्पिलर क्लचसह 6 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, Apache RR 310 बाइक 310 चा टॉप स्पीड द 160किमी प्रति तास आहे.
सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या बाईकला 0 ते 60 किमी प्रति तास वेग पकडण्यासाठी केवळ 2.9 सेकंद इतका वेळ लागतो. TVS Motor कंपनीने Apache RR 310 ला चार रायडिंग मोडसह राइड-बाय-वायर टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. या मोडच्या आधारावर इंजिनचे पॉवर, थ्रॉटल रिस्पॉन्स आणि एबीएस सेटिंग्स बदलू शकतो.