TVS Apache RTR 200 4V सिंगल चॅनल ABS भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत
ही आपल्या सेगमेंट मधील पहिली मोटरसायकल असून ज्यामध्ये रायडिंग मोड्स दिले गेले आहेत. तर कंपनीने या मोटरसायकलची किंमत 1.28 लाख रुपये ठेवली आहे.
TVS Motor Company ने भारतात आपली Apache RTR 200 4V मोटरसायकल लॉन्च केली आहे. ही आपल्या सेगमेंट मधील पहिली मोटरसायकल असून ज्यामध्ये रायडिंग मोड्स दिले गेले आहेत. तर कंपनीने या मोटरसायकलची किंमत 1.28 लाख रुपये ठेवली आहे. ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी कंपनीकडून 3 रायडिंग मोड्स दिले गेले आहेत. ज्यामध्ये स्पोर्ट, अर्बन आणि रेन मोडचा समावेश आहे. याच्या मदतीने तुम्ही विविध रस्त्यांच्या पद्धतीनुसार राइडिंग करु शकता. त्याचसोबत अॅडजेस्टेबल सस्पेंशन आणि अॅडजेस्टेबल लिव्हर्स सुद्धा यामध्ये दिले गेले आहेत. या मोटरसायकलचा डुअल चॅनल ABS मॉडेल सुद्धा याच फिचर्ससह मार्केमध्ये उपलब्ध आहे.
इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 197.75cc, सिंगलम, सिलिंडर, 4 स्ट्रोक, 4 वॉल्व, ऑयल कूल्ड इंजिन दिले गेले आहे. जे 20.82 PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 17.32Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. हे इंजिन RT-Fi तंत्रज्ञान लैस आहे. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्स पेक्षा अधिक आहे. तसेच मोटरसायकलच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क आणि रियरमध्ये मोनो शॉक दिला गेला आहे. मोटरसायकलमध्ये 17 इंचाचा अलॉय व्हिल्स आणि ट्युबसेल टायर्स दिले गेले आहेत. तर फ्रंटला 270mm डिस्क ब्रेक आणि 240mm डिस्क ब्रेक दिला गेला आहे.(2021 Kawasaki Ninja 300 भारतात लॉन्च, किंमत 3.18 लाख रुपये)
अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास नव्या अपाचे पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्ट्र, LED हेडलाइट्स आणि LED DRLs, LED टेललॅम्प, GTT फिचर दिले गेले आहे. जे एक्सेलरेटरसाठी जबरदस्त ट्रॅफिक मध्ये बाईक चालवण्याची मुभा देतो. त्याचसोबत मोटरसायकलमध्ये ब्लुटूथ इनबेल्ड स्मार्ट एक्स कनेक्ट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.