Toyota Kirloskar Motor Data Breach: टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या भारतीय ग्राहकांचा डेटा लिक, कंपनीकडून विशेष सुचना जारी
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या भारतीय ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची किर्लोस्कर मोटर्सकडून देण्यात आली आहे. वर्षाच्या पहिल्याचं दिवशी ही माहिती पुढे आल्याने ऑटोमोटीव्ह जगात खळवळ माजली आहे.
ऑटो उद्योगात डेटा लिकच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी Kia India चे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर आता टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (TKM) च्या भारतीय ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची किर्लोस्कर मोटर्सकडून देण्यात आली आहे. वर्षाच्या पहिल्याचं दिवशी ही माहिती पुढे आल्याने ऑटोमोटीव्ह जगात खळवळ माजली आहे. हॅकर्सच्या निशाण्यावर ऑटोमोटीव्ह कंपनीचं का आहेत असाही प्रशन ता उपस्थित होत आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांनी अधिकृत पत्रक काढत याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे की, कंपनीच्या काही ग्राहकांची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर लीक होऊ शकण्याची संभावना आहे कारण टोयोटा मोटर्सच्या ग्राहकांचा डेटा हॅक करण्यात आला आहे. अजून तरी हा डेटा ऑनलाईन साईटवर लीक केलेला नाही पण पुढील कालावधीत अस होण्याची सक्यता वर्तवण्यात आली आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने या घटनेची सविस्तर माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला (CERT-In) देण्यात आली आहे. तरी कंपनी आपल्या ग्राहकांचा डेटा कुठेही व्हायरल होणार नाही या संबंधीत काळजी घेईल तसेच या हॅकींगमुळे कंपनीच्या ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची खात्री असे किर्लोस्कर मोटर्सने काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे. तरी इंडियन कम्प्युटर्स रिस्पॉन्स टीम या प्रकरणाची सखोल चौकशी करत असुन ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. (हे ही वाचा:- Royal Enfield Bullet Bill Viral: रॉयल एनफील्ड बुलेट फक्त ₹ 18,700 मध्ये, 1986 चे बिल सोशल मीडियावर व्हायरल)
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने डेटा ब्रीच झाल्याचे माहीती दिली असली तरी नेमका कुठल्या ग्राहकांचा कोणता डेटा लीक झाली याबाबत कुठलीही अधिकृत माहिती टोयोटा किर्लोस्कर मोटर्सकडून देण्यात आलेली नाही. तरी येणाऱ्या काहीचं दिवसात या हॅकींगबाबत माहिती पुढे येतील अशी अपेक्षा टोयोटा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)