टॉप 5 पेट्रोल फ्री कार, भारतात लवकरच लॉन्च; इंधन दरवाढीपासून ग्राहकांची सुटका, पाहा किंमत, कशी आहेत फिचर्स?
विशेष म्हणजे प्रदुषणाला आळा घालणाऱ्या आणि पेट्रोल, डिझेलसारख्या इंथनांची गरज नसणाऱ्या या गाड्यांना प्रोत्साहन देण्यसाठी सरकारही तयार आहे. या गाड्यांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गृहसोसायट्यांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन असल्याचेही वृत्त आहे. आज आम्ही अशाच पाच गाड्यांबाबत आपल्याला सांगत आहोत. ज्या यंदाच्या वर्षी आपल्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
Top 5 upcoming electric cars in India in 2019: 2019 हे वर्ष ऑटो इंडस्ट्रीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तज्ज्ञ सांगतात की, या वर्षात ऑटो इंडस्ट्रीचा चेहरामोहराच बदलेन. वाढती महागाई, त्यात सातत्याने वाढत जाणारे इंधन दर आदींमुळे मेटाकुटीला आलेली जनता. तर, दुसऱ्या बाजूला वाढत्या प्रदुषणाला आळा कसा घालावा यासाठी चिंतेत असलेले सरकार. हे चित्र 2019 मध्ये बदलू शकते. लवकरच इलेक्ट्रिक कार (Electric Cars) ग्राहकांच्या भेटीला येत आहेत. नामवंत ऑटो कंपन्या या कार निर्मितीवर जोरदार काम करत आहेत. विशेष म्हणजे प्रदुषणाला आळा घालणाऱ्या आणि पेट्रोल, डिझेलसारख्या इंथनांची गरज नसणाऱ्या या गाड्यांना प्रोत्साहन देण्यसाठी सरकारही तयार आहे. या गाड्यांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गृहसोसायट्यांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन असल्याचेही वृत्त आहे. आज आम्ही अशाच पाच गाड्यांबाबत आपल्याला सांगत आहोत. ज्या यंदाच्या वर्षी आपल्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
निसान लीफ (Nissan Leaf)
जापनीज वाहन निर्माता असलेली कंपनी निसान (Nissan) इलेक्ट्रिक व्हेईकल सेग्मेंटमध्ये मोठी आघाडी घेत आहे. जागतीक बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी कार Nissan Leaf ही क्लीन मोबिलीटीसाठी प्रसिद्ध आहे. Nissan लवकरच आपली कार भारतातही लॉन्च करत आहेत. या वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजेच जूनच्या आसपास ही कार ग्राहकांच्या भेटीला भारतात येऊ शकते. प्राप्त माहितीनुसार, Nissan Leaf कारमध्ये 40 kWh ते 62 kWh पर्यंतची बॅटरी असू शकते. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर कार सुमारे 364 किलोमीटरचे अंतर सहज कापू शकते. याशिवाय कारमध्ये क्विक जार्जिंग सिस्टमही असणार आहे. ज्यामुळे केवळ 40 ते 80 टक्के बॅटरी काही मिनिटांमध्ये चार्ज होईल. मात्र, या कारची किंमत साधारण 25 ते 30 लाख रुपये असू शकते.
रेनो क्विड (Renault Kwid)
फ्रेंच कार उत्पादक कंपनी रेनो (Renault) आपल्या लोकप्रिय रेनो क्विड (Renault Kwid) कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच लॉन्च करु शकते. युरोपमध्येही रेने कंपनी टॉप इलेक्ट्रिक कार विक्रेता कंपनीपैकी एक आहे. सध्या रेनो ही भारतातही ही कार लॉन्च करण्याच्या विचारात आहे. प्राप्त माहिती अशी की, Renault Kwid चे इलेक्ट्रिक व्हर्जन कारची बॅटरी फूल सिंगल चार्ज केल्यास 250 अंतर कापू शकते. या कारला डबल चार्ज सुविधाही असणार आहे. ज्याचा फायदा डोमेस्टिक आणि पब्लिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अशा दोन्ही ठिकाणी होऊ शकतो. (हेही वाचा, कार खरेदी करताय? मग डील करताना या गोष्टींची माहिती हवीच..)
टाटा टियागो (Tata Tiago)
टाटा मोटर्स आपली कॉम्पेक्ट सेडान कार Tiago चे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच बाजारात आणत आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजेच येत्या जून महिन्यांच्या आसपासप ही कार भारतीय रस्त्यांवर धावायला सुरुवात करेन. इलेक्ट्रिक व्हर्जन असलेली भारतातील ही सर्वात स्वस्त कार ठरु शकते. या कारची किंमत 6 लाख रुपयांच्या आसपास असू शकते असा अंदाज मार्केटमध्ये व्यक्त केला जातो आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही कार सिंगल चार्जिंगमध्ये सुमारे 130 किलोमिटरचे आंतर कापू शकते. याशिवाय कारमध्ये 30kW ची इलेक्ट्रिक मोटर दिली जाण्याची शक्यता आहे.
मारुती वॅगन आर (Maruti Wagon-r)
मारुती सुझुकी ही कंपनीसुद्धा भारतात आपली लोकप्रिय कार वॅगन आर (Maruti Wagon-r) येत्या 23 जानेवारीला लॉन्च करण्याची शक्यता आहे. Maruti Wagon-rच्या सुमारे 50 यूनिट्सची टेस्टिंग सध्या सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
महिंद्रा केयूसी 100 (Mahindra KUV 100)
महिंद्राची KUV100 एक कॉम्पॅक्ट हॅचबॅक इलेक्ट्रिक कार असणार आहे. दरम्यान, कंपनीने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार KUV100 चे इलेक्ट्रिक व्हर्जन भारतात लवकरच लॉन्च केले जाईल. ही कार सिंगल चार्जमध्ये 140 km इतके अंतर कापू शकेन. याशिवया या कारची बॅटरी प्रतितास 80% इतकी चार्ज होईल, असे सांगण्यात येत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)