Tata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक
टाटा मोटर्सने ही प्रीमियम एसयूवी टाटा सफारी गोल्डला दोन रंगात लॉन्च केले आहे. त्यामध्ये सफेद गोल्ड आणि ब्लॅक गोल्डचा समावेश आहे.
टाटा मोटर्सने (Tata Motors) आपली प्रसिद्ध एसयुवी टाटा सफारीच्या नेक्स जेन अॅडिशनला लॉन्च केले आहे. टाटा मोटर्सने ही प्रीमियम एसयूवी टाटा सफारी गोल्डला दोन रंगात लॉन्च केले आहे. त्यामध्ये सफेद गोल्ड आणि ब्लॅक गोल्डचा समावेश आहे. कंपनी ही नवी एसयुवीचा फर्स्ट पब्लिक अपीअरेंस आयपीएलच्या दरम्यान दुबईत करणार आहे. या नव्या एसयुवीमध्ये नागरिकांना शानदार गोल्ड एक्सटेरियर आणि इंटिरियर दिले आहे. या व्यतिरिक्त यामध्ये कंपनीने R18 चारकोल ब्लॅक अलॉय व्हिल्स दिले आहे.
कंपनीने या एसयुवीच्या सफेद गोल्ड वेरियंटला फ्रॉस्ट वाइट कलर सोबत मॅच केले आहे. तसेच एसयुवीच्या रुफला ब्लॅक रंग दिला आहे. ज्यामुळे ड्युअल टोन दिसून येतो. या एसयुवीच्या इंटीरियरमध्ये मोंट ब्लॅक मार्बल फिनिश पॅड याचा लूक वाढवतो. तसेच एसयुवीच्या ब्लॅक गोल्ड अॅडिशनचा कलर हा कॉफी बीन पासून प्रेरित आहे. तसेच रेडियंट गोल्ड एक्सेंट याच्या एक्सटेरियरला अधिक शानदार बनवतात. या वेरियंटच्या इंटरियर मध्ये डार्क मार्बल फिनिश मिड पॅड आणि गोल्ड टच दिला आहे.(TATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये)
Tweet:
अन्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ओएटस्टर वाइट डायमंड क्विल्टेड लेदर सीट, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, फर्स्ट अॅन्ड सेकंड रो मध्ये सुद्धा वेंटिलाइजेशन दिले आहे. या व्यतिरिक्त अॅन्ड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले वायफाय दिला गेला आहे. कंपनीने या कारची किंमत 21.89 लाख रुपये ठेवली आहे. ही कार फ्लॅगशिप हॅरियर आधारित एसयुवी 6 आणि 7 सीटर आहे. ती OMEGARC आर्किटेक्चर असून जी लँड रोर D8 प्लॅटफॉर्म पासून प्रेरित आहे. हे इंजिन 170PS ची पॉवर आणि 350Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे.