Tata Nexon, Tigor आणि Tiago फेसलिफ्ट भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही
टाटा नेक्सॉन (Tata Nexon), टाटा टियागो (Tata Tiago) आणि टाटा टियागो फेसलिफ्ट (Tata Tiago Facelift) या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या अद्ययावत प्रणालीसह BS6 कंप्लायंट इंजिनसह लॉन्च करण्यात आल्या आहेत. टाटा नेक्सॉन (Tata Nexon) कॉम्पॅक्ट एसयूव्हीसोबतच तीन गाड्या फ्रंट रिडिजाइन करण्यासोबतच फिचर्सही देण्यात आले आहेत.
टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीच्या 4 नव्या कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्या आहेत. यात नव्या प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz) सह टाटा नेक्सॉन (Tata Nexon), टाटा टियागो (Tata Tiago) आणि टाटा टियागो फेसलिफ्ट (Tata Tiago Facelift) या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या अद्ययावत प्रणालीसह BS6 कंप्लायंट इंजिनसह लॉन्च करण्यात आल्या आहेत. टाटा नेक्सॉन (Tata Nexon) कॉम्पॅक्ट एसयूव्हीसोबतच तीन गाड्या फ्रंट रिडिजाइन करण्यासोबतच फिचर्सही देण्यात आले आहेत.
एका एक्स शोरुममध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या नव्या टाटा नेक्सॉन एसयूव्हीची किंमत 6.95 लाख रुपये तर, डिझेलवर चालणाऱ्या टाटा नेक्सॉन एसयूव्हीची किंमत 8.45 लाख इतकी सांगण्यात येत आहे. Tata Tigorआणि Tata Tiago चे इंटेटियर अपडेट करण्यात आले असून, त्याला आगोदरपेक्षा अधिक शार्प लूक देण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी टाटा अल्ट्रॉजसारखी दिसत असल्याचा दावाही काही कारप्रेमी करतात. नव्या टाटा Tata Tigorची किंमत 5.57 लाखांपासून सुरु होत आहे. मात्र, एका शोरुममध्ये टाटा यियागोची बेस व्हेरियंट किंमत 4.60 लाख रुपये इतकी सांगण्यात येत आहे.
किंमत आणि इंजिन
नव्या एसयुव्हीत सर्वात मोठा बदल हा इंजिनमध्ये करण्यात आला आहे. कारमध्ये आगोदरपासूनच 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डीजल इंजिन देण्यात आले आहे. आता त्याला BS6 मध्ये अपग्रेड करण्यात आले आहे. दोन्ही इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि एटीएम ट्रान्समिशन देण्यात आले आहे. (हेही वाचा, Ford India ची नवी इकोस्पोर्ट्स BS6 कार भारतात लाँच; जाणून घ्या याच्या खास वैशिष्ट्यांविषयी)
Tata Tigorआणि Tiago Facelift फिचर्स
या दोन्ही एसयुव्हीच्या फ्रंट लूकमध्ये बदल करण्यता आला आहे. यात नवे बंपर, नवे ग्रिल आणि नवे हेडलँप्म्स देण्यात आले आहेत. नव्या टिगोरमध्ये खालच्या बंपरवर DRL असल्याचे पाहायला मिळते जे टियागोमध्ये दिसत नाहीत. इंटेरियरबाबत बोलायचे तर सेमी-डिजिटल गेज, फ्लॅट स्टेयरींग व्हिल, रिव्हर्स कॅमेरा यांसोबत 7 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम पाहायला मिळते. इन्फोटेन्मेंट सिट्सम अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोला सपोर्ट करते. टाटा डिगोरमध्ये गाडी सुरु आणि बंद करण्यासाठी पूश बटनही देण्यात आले आहे. टाटा मोटर्सने म्हटले आहे की, या दोन्ही गाड्यांना आंतरराष्ट्रीय NCAP सेफ्टी टेस्टसाठी 4 स्टार मिळाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)