Tata Motors Launches ‘Festive of Cars’: टाटा मोटर्सने लाँच केले 'फेस्टिव्ह ऑफ कार्स'; सणासुदीच्या काळात सवलतीच्या दरात वाहने खरेदी करण्याची संधी, मिळू शकतात 2.05 लाखांपर्यंतचे एकत्रित फायदे

फेस्टिव्हल ऑफ कार्स ऑफर अंतर्गत टाटा मोटर्सच्या एंट्री लेव्हल कार Tiago ची किंमत 65,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे आणि या हॅचबॅकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 4,99,900 रुपये आहे.

Tata Motors | (Photo Credits: Tatamotors.com)

Tata Motors Launches ‘Festive of Cars’: भारतात सणासुदीला सुरुवात झाली आहे. या सणासुदीच्या काळात कार उत्पादक कंपन्या आपली विक्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशभरातील जवळपास सर्व कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या गाड्यांवर सवलतीच्या ऑफर जारी केल्या आहेत, ज्यामध्ये टाटा मोटर्स (Tata Motors), किया, मारुती, महिंद्रा, जीप आणि इतर डीलरशिप एसयूव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. देशांतर्गत कार कंपनी टाटा मोटर्सने फेस्टिव्हल ऑफ कार्स लाँच केले आहे, ज्यामध्ये ग्राहकांना कार आणि एसयूव्ही खरेदीवर 2.05 लाखांपर्यंतचे एकत्रित फायदे मिळू शकतात. तुम्ही टाटा मोटर्सच्या फेस्टिव्हल कार ऑफरचा लाभ 31 ऑक्टोबरपर्यंत घेऊ शकता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त कार Tiago ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 5 लाख रुपयांपेक्षा कमी झाली आहे.

फेस्टिव्हल ऑफ कार्स ऑफर अंतर्गत टाटा मोटर्सच्या एंट्री लेव्हल कार Tiago ची किंमत 65,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे आणि या हॅचबॅकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 4,99,900 रुपये आहे.

टाटा मोटर्सच्या लोकप्रिय सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉनच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटच्या किमती 80 हजार रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. टाटा नेक्सॉनची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 7,99,990 रुपयांपासून सुरू झाली आहे.

फेस्टिव्हल ऑफ कार्स ऑफर अंतर्गत टाटा मोटर्सच्या प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझच्या किंमतीत 45 हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे आणि नवीन एक्स-शोरूम किंमत आता 6,49,900 रुपयांपासून सुरू झाली आहे. (हेही वाचा: Tata Curvv ICE पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स घ्या जाणून)

टाटा मोटर्सच्या सर्वात शक्तिशाली SUV Safari ची किंमत आजकाल 1.80 लाख रुपयांनी कमी झाली आहे आणि नवीन एक्स-शोरूम किंमत आता 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनी वाहनावर 45,000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त फायदे देखील देत आहे.

टाटा मोटर्सच्या पॉवरफुल मिडसाईज एसयूव्ही हॅरियरची किंमत 1.60 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे आणि हॅरियरची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 14,99,000 रुपयांपासून सुरू होते.

टाटा मोटर्सच्या एंट्री लेव्हल सेडान टिगोरच्या किमतीत 30 हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे आणि आता नवीन एक्स-शोरूम किंमत 5,99,900 रुपयांपासून सुरू होते. टिगोरच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

दरम्यान, फेस्टिव्हल ऑफरची घोषणा करताना, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवत्स म्हणाले की, त्यांना खात्री आहे की ग्राहक टाटा कार घेण्याच्या या संधीचा नक्कीच फायदा घेतील.

(टीप: ही बातमी इंटरनेट आधारीत आहे. लेटेस्टली मराठी या गाड्यांच्या किमतीची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी कंपनी अथवा अधिकृत डीलरशी संपर्क साधावा.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif