Tata Motors ने टीझर लॉन्च झळकवली आपली एसयुवी HBX
कंपनीच्या या एसयुवी कॉन्सेप्ट मॉडेलला गेल्या वर्षात ऑटो एक्सपो दरम्यान शोकेस करण्यात आले होते.
देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) गेल्या दीर्घ काळापासून आपली मायक्रो एसयुवी HBX संबंधित चर्चेत आहे. कंपनीच्या या एसयुवी कॉन्सेप्ट मॉडेलला गेल्या वर्षात ऑटो एक्सपो दरम्यान शोकेस करण्यात आले होते. आता कंपनीने ही अधिकृतरित्या लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनीने याचा एक टीझर सुद्धा जाहीर केला आहे. ज्यामध्ये एचबीएक्सचे प्रोडक्शन मॉडेलचा पहिला लूक दिसला आहे.(Honda Launch CB200X: होंडाची CB200X बाईक भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध, पहा किंमत आणि वैशिष्ट्ये)
कंपनीने आपल्या या एसयुवीचा एक प्रमोशन व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. त्यामध्येच त्यांनी आपली आगामी एसयुवी HBX बद्दल सांगितले आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये एचबीएक्सचे हेडलाइट्स दिसून येत असून स्लीक एलईडीचा एक सेट सुद्धा दिसत आहे. हा सेट हॅरियर किंवा सफारी सारख्या कंपनीच्या नव्या मॉडेलमध्ये दिला जातो.
Tweet:
भारतातील रस्त्यांवर HBX टेस्टिंगच्या स्पाय शॉट्सनुसार, रफ लुकसाठी यामध्ये चौकोर व्हिल आर्च आणि साइड्सवर ब्लॅक क्लॅडिंग दिले जाऊ शकतात. टाटाची ही मायक्रो एसयुवी कंपनीची इंपॅक्ट 2.0 डिझाइन लॅग्वेजला सपोर्ट करणार आहे. याचा फ्रंट टाटाच्या सिग्नेचर ह्युमॅनिटी लाइन ग्रिलसह येणार आहे. अल्ट्रोज हॅचबॅकनंतर हॉर्नबिल कंपनी लाइनअपमध्ये दुसरे मॉडेल आहे. जे ALFA प्लॅटफॉर्म द्वारे रेखांकित केले जाणार आहे, टाटाच्या या मायक्रो एसयुवीची टक्कर भारतात रेनॉ काइगर, निसान मॅग्नाइट सारख्या कारसोबत होणार आहे.
टाटाने अद्याप एचबीएक्स मायक्रो एसयुवीच्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक माहिती दिलेली नाही, मात्र यामध्ये Tiago, Tigor आणि Altroz मध्ये वापरण्यात येणाऱ्या 1.2 लीटर पेट्रोल इंजिन द्वारे संचलित करण्याची शक्यता आहे. इंजिनच्या पाच स्पीड मॅन्युअल किंवा ड्रावइव्ह मोडसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन सुद्धा दिला जाऊ शकतो.