Tata Cars Price Hike: टाटा कारच्या किमतीत मोठी वाढ, जाणून घ्या Tata Altroz, Tata Punch चे नवे वाढीव दर

कंपनीने पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत.

Tata Motors logo | (File Photo)

गेले वर्षात टाटा कडून विविध नवनवीन कार लॉंच करण्यात आल्या. या कारला भारतात चांगलीचं पसंती मिळाली. टाटा अल्ट्रोज,टाटा नेक्सॉन ,टाटा पंच या गाड्याची मोठी विक्री गेले वर्षात झाली. टाटाने नव्याने लॉंच केलेल्या गाड्यांमध्ये डेव्हलप टेक्नोलॉजी, उत्तम मायलेज आणि शिवाय सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने या गाड्यांना भारतात वाव मिळाला. पण टाटाच्या विविध गाड्यांच्या किमतीत आता वाढ करण्यात आली आहे. कंपनीने पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. तरी तुम्ही आता टाटा ची कार घेण्याचा प्लान करत असाल तर तुम्हाला आता त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. टाटा अल्ट्रोज, नेक्सोन, टिआगो, पंच, हरिहर, सफारी या गाड्यांच्या वाढीव किमती टाटा कडून जाहिर करण्यात आल्या आहेत.

 

टाटा टिआगो ही टाटाची सर्वात स्वस्त कार आहे. जुन्या दरानुसार या कारची किंमत ६,४४,९०० एवढी होती. पण नवीन दरासह आता टिआगोची किंमत ७,५४,९०० रुपये असणार आहे. म्हणजे टाटा टिआगोच्या किमतीत तब्बल ९० हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. टाटा टिगोर याकारच्या किमतीत तर तब्बल दीड लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी टाटा टिगोर ६,०९,९०० रुपयांत उपलब्ध होती तर आता वाढीव दरानुसार ८,५३,९०० रुपये किंमत असणार आहे. (हे ही वाचा:- PMV Micro Electric Car: 16 नोव्हेंबरला येणारी छोटी इलेक्ट्रिक कार; 4 तासात होणार पूर्ण चार्ज, 200 KM पर्यंत धावेल)

 

टाटा पंचची ही कार गेल्या वर्षी टाटाच्या कार्सपैकी सर्वाधिक विकले गेलेली कार आहे. सुरुवातीच्या टाटा पंचच्या किमतीनुसार ५,९९,९०० रुपये एवढी होती तर आता पंचच्या टॉप व्हेरिअंटची किंमत ९,५३,९०० रुपये एवढी आहे. नेक्सॉन ही कंपनीची बेस्ट सेलिंग कार आहे. नेक्सॉनची सुरवातीची किंमत ७,६९,९०० रुपये एवढी होती तर आता टॉप व्हेरिअंटची किंमत १४,१७,९०० रुपये आहे. तसेच जुन्या किमतीनुसार टाटा अल्ट्रोज ६,३४,९०० रुपये आणि टाटा हरिहर १४,७९,९०० रुपये अशा किमती होत्या पण आता नव्या दरासह टाटा अल्ट्रोजची किंमत १०,२४,९०० रुपये तर हरिहरसाठी २२,३४,९०० रुपये मोजावे लागणार आहे.