Royal Enfieldची 650cc वाली नवी कोरी बाईक धावणार तब्बल 160 च्या स्पीडने

Royal Enfieldनेही काळानुरुप बदल करत आपल्या बाईकमध्ये अनेक बदल केले. बाजारात नवनवी मॉडेल्स आणली. त्यामुळे या बाईकने तरुणाईला अक्षरश: वेड लावले.

(Photo Credits: royalenfield.com)

एकेकाळी गावचा एखादा पुढारी किंवा वजनदार शेतकरी सोडता Royal Enfield सांभाळण्याचे धाडस फारसं कुणी दाखवत नसे. पण, Royal Enfieldनेही काळानुरुप बदल करत आपल्या बाईकमध्ये अनेक बदल केले. बाजारात नवनवी मॉडेल्स आणली. त्यामुळे या बाईकने तरुणाईला अक्षरश: वेड लावले. तरुणाईच कशाला ज्येष्ठ मंडळींचेही या बाईकवर काहीसे अधिकच प्रेम असते. रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकींवर तुम्ही सहजपणे कटाक्ष टाकाल तर, तुम्हाला बहुतांश Royal Enfield दिसतील. यावरुनच तुम्हाला या बाईकची क्रेझ लक्षात येईल. तर, अशी ही Royal Enfield लवकरच आपली नवी कोऱ्या आणखी दोन दमदार बाईक लवकरच लॉन्च करत आहेत.

Interceptor 650 आणि Continental GT 65 नावाने Royal Enfield या दोन्ही बाईक लॉन्च करत आहे. या बाईकमध्ये 648cc सीसीचे दमदार इंजिन असणार आहे. तसेच, Royal Enfield चे हे सर्वात पॉवरफूल इंजिन म्हणूनही ओळखले जाते. कंपनीने दावा केला आहे की, 'इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेन्टल जीटी 650मध्ये दिले जाणारे हे इंजिन 160 किलोमीटर प्रतिसासाहून अधिक काळ गतीने धावू शकते. तसेच, प्रतिलीटर 25.5 किलोमीटरचे मायलेज देईल'.

Royal Enfield इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 बाईकमध्ये 648cc एयरकूल्ड, एसओएचसी, फ्यूल इंजेक्टेड पॅरलल-ट्विन इंजिन दिले जाईल. हे इंजिन 7,100rpm वर 47hpची पॉवर आणि 4,000rpm वर 52Nm टॉर्क जेनरेट करते. यात 6 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स आणि स्लिपर क्लच असेल. तर, 25.5 किलोमीटर मायलेजचा कंपनीने केलेला दावा विचारात घेता ही बाईक वर्ल्ड मोटारसायकल टेस्ट सायकल (WMTC) मध्ये समाविष्ट आहे.

बाईकच्या स्टाईलबाबत बोलायचे तर Royal Enfield Continental GT 650चे डिझाईन कॅफे रेसर आणि Royal Enfield Interceptor 650 चे डिझाईन स्ट्रीट बाईकसारखे असेल. इंटरसेप्टर 650 मध्ये 13.7 लीटरचे फ्यूल टॅंक असेल. कान्टिनेंटल जीटी 650मध्ये त्याहून काहीसा छोटा 12.5 लीटरचा फ्यूल टँक दिला आहे. या दोन्ही बाईक्स भारतामध्ये लवकरच लॉन्च होतील अशी आशा आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now