Royal Enfield Classic 350 Launch: रॉयल एनफील्ड क्लासिक भारतात लॉन्च, किंमत, फिचर्स घ्या जाणून

रॉयल एनफील्ड क्लासिक (Royal Enfield Classic 350 Launch In India) भारतात लॉन्च झाली आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक (Royal Enfield Classic 350) लॉन्च कधी होणार याबाबत प्रदीर्घ काळापासून बाईक प्रेमींंमध्ये उत्सुकता होती. अखेर ही उत्सुकात संपून ही बाईक भारतात लॉन्च झाली आहे

Royal Enfield Classic 350 | | (Photo Credit: Twitter/Royal Enfield)

रॉयल एनफील्ड क्लासिक (Royal Enfield Classic 350 Launch In India) भारतात लॉन्च झाली आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक (Royal Enfield Classic 350) लॉन्च कधी होणार याबाबत प्रदीर्घ काळापासून बाईक प्रेमींंमध्ये उत्सुकता होती. अखेर ही उत्सुकात संपून ही बाईक भारतात लॉन्च झाली आहे. या बाईकच्या किंमत, फिचर्स (Royal Enfield Classic 350 Features) आणि इतर गोष्टींबाबत माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार एका एक्स शोरुममध्ये या बाईकची किंमत 1.84 लाख रुपये (Royal Enfield Classic 350 Price) सांगितली जात आहे. रॉयल इनफील्डची 2021 क्लासिक 350 ला 5 व्हेरीएट्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ज्यात रेडिच, हेलक्योन, सिगनल्स, डार्क आणि क्रोम आदींचा समावेश आहे.

नव्या क्लासिक 350 चे क्रोम व्हेरिएंट हे टॉप मॉडेल आहे. याची एक्स शोरुममधील किंमत 2.15 इतकी सांगितली जात आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत या बाईकचे योगदान जवळपास 80% इतके आहे. हे दुसरे नवेकोरे मॉडेल आहे ज्याला मीटिओर 350 नंतर लॉन्च करण्यात आले आहे. बाईकला जे प्लॅटफॉर्मनुसार निर्माण करण्यात आले आहे. ज्याचा अर्थ असा की याला समना डबल क्रैडल चेसिस देण्यात आली आहे. जसे मीटिओर 350 ला मिळाले आहे. (हेही वाचा, बाइकच्या पार्ट्समध्ये 'या' समस्या येतायत? दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान)

रॉयल एनफील्ड ने क्लासिक 350 सोबत पहिल्यासारखेच 349 cc सिंगल-सिलेंडर डीओएचसी इंजिन दिले आहे. जे 6,100 आरपीएवर 20.2 बीएचपी पर्यंत आणि 4,000 आरपीएमवर 27 एनएम पीक टॉर्क बनवतो. कंपनीने या इंजिनसोबत 5 स्पीड गियरबॉक्स दिला आहे.

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 डिजाईनबाबत सांगायचे तर बाईक थोडाफार फरक वगळता आगोदरच्या बाईकसारखीच आहे. जी मॉडर्न क्लासिक अंदाजात आहे. कंपनीने बाईकला नव्या रंगात सादर केले आहे. तसेच प्रत्येक बाईकची (सेम मॉडेल रंग वेगळा) किंमत वेगवेगळी ठेवली आहे. बाईकला पार्ट अॅनेलॉग पार्ट डिलिटल इन्स्ट्रुमेंट कंन्सोल दिला आहे. ज्यात छोटासा डिस्प्ले, फ्यूल गेज, ओडोमीटर आणि इतरही काही गोष्टी देण्यात आल्या आहेत. बाइकच्या टॉप मॉडेलला ट्रिपर नेविगेशन देण्यात आले आहे. जे ब्लुटुथच्या माध्यमातून काम करते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now