Rivian Layoffs: इलेक्ट्रिक कार निर्माता रिव्हियन ऑटोमोटिव्ह कंपनी करणार 6% कर्मचारी कपात
कंपनीने तसे जाहीर केले आहे. रिव्हीयन ऑटोमोटिव्ही कंपनीचे मुख्य कार्यकारी आर.जे. स्कॅरिंज यांनी कर्मचार्यांना केलेल्या ईमेलमध्ये नोकरी कपातीची घोषणा बुधवारी केली.
जागतिक मंदी (Global Recession) जगभरातील अनेक देशांच्या डोक्यावर टांगती तलवार म्हणून लटकते आहे. संभाव्य मंदी गृहीत धरुन मग जगभरातील मातब्बर कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका लावला आहे. यात गूगल (Google), मायक्रोसॉफ्ट (Microsoft), अमेझॉन (Amazon), स्विगी (Swiggy), FedEx यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. याच पावलावर आता इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी Rivian Automotive (RIVN.O) सुद्धा पाऊल टाकत आहे. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, रिव्हियन ऑटोमोटिव्ह (Rivian Automotive) आपल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 6% कर्मचारी कपात (Rivian Layoffs) करत आहे. कंपनीने तसे जाहीर केले आहे. रिव्हीयन ऑटोमोटिव्ही कंपनीचे मुख्य कार्यकारी आर.जे. स्कॅरिंज यांनी कर्मचार्यांना केलेल्या ईमेलमध्ये नोकरी कपातीची घोषणा बुधवारी केली.
रिव्हियन ऑटोमोटिव्ह कंपनीने कामगार कपातीबाबत माहिती देताना म्हटले आहे की, इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनातील खर्च रोखणे, आगोदरच घटलेली मागणी, अर्थव्यवस्थेत आलेली कमकुवतता त्यामुळे त्याचा कंपनीच्या उत्पन्न, महसूल आणि त्याचा नफ्यावर झालेला परीणाम आदी कारणांना डोळ्यासमोर ठेऊन कर्मचारी कपातीचा निर्णय कंपनीला घ्यावा लागता आहे. आर.जे. स्कॅरिंज यांनी आहे की, वाहनांचे उत्पादन वाढवण्यावर आणि नफा मिळवण्यावर कंपनी भर देत आहे. तरीही कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागतो आहे. (हेही वाचा, FedEx Layoffs: फिडेक्स कंपनी करणार 10% कर्मचारी कपात)
ट्विट
सांगितले जात आहे की, टेस्ला आणि फोर्डच्या किंमतीतील कपातीमुळे रिव्हियन, ल्युसिड ग्रुप (एलसीआयडी.ओ) आणि ब्रिटिश स्टार्टअप अरायव्हल सारख्या इलेक्ट्रिक व्हेईकल बनविणाऱ्या अपस्टार्ट्सना नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिणाम विचारात घेऊन कंपनी आतापासूनच कडक धोरणे आखत आहे.