IPL Auction 2025 Live

OLA S1 Air To Be Launch Tomorrow: OLA ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर S1 Air उद्या होणार लॉन्च; फुल चार्जवर धावणार 125 किमी, काय आहेत खास फीचर्स? जाणून घ्या

ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 125 किलोमीटरची रेंज पूर्ण करेल. याशिवाय या स्कूटरचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रतितास असा सांगण्यात आला आहे.

OLA S1 Air electric scooter (PC - Twitter| @OlaElectric)

OLA S1 Air To Be Launch Tomorrow: इलेक्ट्रिक स्कूटर हे आता देशाचे भविष्य असून वेगवेगळ्या देशांतर्गत इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपन्या याचा फायदा घेत आहेत. देशातील आघाडीची ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी OLA इलेक्ट्रिक आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी लॉन्च करणार आहे. OLA S1 Air असे या स्कूटरचे नाव आहे. ही ओलाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि तिची सुरुवातीची किंमत 1.09 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, या किमतीत काही लोकांनाच ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार आहे.

OLA S1 Air ही कंपनीची आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. त्याची किंमत 1.09 लाख रुपये आहे. पण जे 28 ते 30 जुलै दरम्यान OLA S1 Air खरेदी करतील त्यांना ही स्कूटर 1.09 लाख रुपयांमध्ये मिळेल. यानंतर म्हणजेच 31 जुलैपासून जो कोणी ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करेल, त्यांना त्यासाठी 1.19 लाख रुपये द्यावे लागतील. (हेही वाचा -OLX Layoffs: ओएलएक्स करणार टाळेबेंदी, जगभरातील 800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन हटवणार;ऑटो व्यवसायातील संघर्षानंतर कंपनीचा निर्णय)

OLA S1 इलेक्ट्रिक स्कूटर कशी बुक करावे?

तुम्हालाही OLA इलेक्ट्रिकची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल, तर तुम्ही वेबसाइटवर जाऊन ती सहजपणे बुक करू शकता. यासाठी तुम्हाला 999 रुपये टोकन मनी भरावे लागतील. त्यानंतर तुम्ही वेबसाइटवर जाऊन स्कूटर बुक करू शकता.

OLA S1 एअरची टॉप रेंज -

कंपनीच्या वेबसाइटनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप किंवा प्रमाणित रेंज 125 किमी असल्याचे सांगितले जाते. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 125 किलोमीटरची रेंज पूर्ण करेल. याशिवाय या स्कूटरचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रतितास असा सांगण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 4 कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केली जाईल. अलीकडेच कंपनीने नियॉन ग्रीन कलरसह एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. या स्कूटरमध्ये 34 लीटरची बूट स्पेस दिली जाईल.

OLA S1 Air ची वैशिष्ट्ये -

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या स्कूटरमध्ये 7-इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 800*480 आहे. स्कूटरचे हेडलॅम्प आणि टेललॅम्प LED सह येतात. स्कूटर इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स ड्राइव्हसह येते. स्कूटर 4.5 किलोवॅटची पीक पॉवर जनरेट करते.