Mozilla Layoffs 2024: Mozilla मध्ये टाळेबंदी, 5 टक्के कर्मचाऱ्यांची करणार कपात- Report

फायरफॉक्स ब्राउझरचा डेव्हलपर Mozilla 60 कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे, कारण कंपनीने अनेक उत्पादनांमधील आपली गुंतवणूक कमी करण्याची योजना आखली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Mozilla

Mozilla Layoffs 2024: फायरफॉक्स ब्राउझरचा डेव्हलपर Mozilla 60 कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे, कारण कंपनीने अनेक उत्पादनांमधील आपली गुंतवणूक कमी करण्याची योजना आखली आहे. Mozilla ने एका मेमोमध्ये म्हटले आहे की ते “फायरफॉक्समध्ये विश्वासार्ह AI” आणण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. Mozilla आता Pocket, Content आणि AI/ML टीम एकत्र आणेल जे Firefox ऑर्गनायझेशनसह इतर काम करेल. TechCrunch ने त्याच्या अहवालात म्हटले आहे. अपडेटनुसार, कंपनी आपल्या टीममधून सुमारे 60 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या हे प्रमाण ५ टक्के आहे.

 "मोझप्रॉड' मध्ये कमी हेडकाउंट बजेट पाहता, लोक आणि इतर समर्थन सेवा संस्थांमध्ये काही भूमिका एकत्रित केल्या गेल्या आहेत ज्यामुळे आम्ही आमच्या उत्पादन पोर्टफोलिओला योग्य स्तरावर समर्थन देत आहोत," कंपनीने म्हटले आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल?

या टाळेबंदीचा कंपनीतील उत्पादन संघावर परिणाम होईल. कंपनी तिच्या काही प्रकल्पांवर काम करत आहे, ज्या अंतर्गत फायरफॉक्स मोबाइल फोनवर अधिक चांगले काम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासोबतच कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचाही शोध घेत आहे.

कर्मचाऱ्यांना का काढले जात आहे?

फायरफॉक्सने केलेली ही टाळेबंदी हे अनेक टेक कंपन्या करत असता. जेव्हा कंपन्या काही नवीन नियोजनावर काम करत असता तेव्हा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करतात. Mozilla Firefox मध्ये करण्यात आलेला हा ले-ऑफ कंपनीच्या भविष्यातील रणनीतीचा संकेत म्हणूनही विचार केला जात आहे. कंपनी अशा क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे ज्यांना तिला वाढण्यास मदत होईल असा विश्वास आहे. AI च्या या युगात, कंपनी फायरफॉक्सला AI सह स्मार्ट बनवत आहे. कंपनीने Fakespot खरेदी केले आहे. कंपनी बाजार विभागातील गुंतवणूक कमी करत आहे. कायदेशीर/धोरण, वित्त आणि व्यवसाय ऑपरेशन्स, मार्केटिंग किंवा धोरण आणि ऑपरेशन्समध्ये कोणतेही बदल होणार नाहीत, असे कंपनीने म्हटले आहे.