Maruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा

अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये नव्या इर्टिगाचं बुकिंग करणं शक्य आहे.

इर्टिगा नेक्स जनरेशन कार photo credit : Maruti suzuki website

मारुती सुझुकीची लोकप्रिय मल्टी पर्पस कार इर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) लवकरच नव्या अंदाजामध्ये सादर केली जाणार आहे. २१ नोव्हेंबरला लॉन्च होणाऱ्या इर्टिगा नेक्स जनरेशन कारसाठी बुकिंग सुरु करण्यात आले आहे. अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये नव्या इर्टिगाचं बुकिंग करणं शक्य आहे. यासाठी मारुती सुझुकी एरेना डिलरशीप नेटवर्कद्वारे बुकिंग होणार आहे. Maruti Suzuki च्या वेबसाईटवर किंवा 1800-102-1800 टोल फ़्री क्रमांकावर Ertiga चं बुकिंग केलं जाणार आहे.

पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही स्वरूपात नवी मारुती सुझुकी इर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) उपलब्ध असणार आहे. नव्या पेट्रोल . व्हेरिएंटमध्ये ड्युअल बॅटरी सेटअप तर डिझेल व्हेरिएंटमध्ये सिंगल बॅटरी सेटअप असणार आहे. नवी एर्टिगा ५ विविध रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. ऑबर्न रेड, मॅग्मा ग्रे, ऑक्सफोर्ड ब्ल्यू , आर्कटिक व्हाइट आणि सिल्की सिल्वर हे पाच रंग उपलब्ध असतील. सेकंड जनरेशनमधील इर्टिगाची किंमत एक्स शोरूम सुमारे 6.4 लाख ते 10.8 लाख रूपये आहे. Maruti Suzuki Next Gen Ertiga ची फिचर्स काय असतील ?

मारुती सुझुकी इर्टिगा नेक्स जनरेशन देशभरातील सर्व डीलर्सपर्यंत पोहचल्यानंतर जुनं मॉडेल पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सध्या बाजारात असलेल्या इर्टिगा मॉडेलचं उत्पादन थांबवण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif