मारूती सुझुकीची इर्टिगा पुन्हा स्वरूपात येणार, 21 नोव्हेंबरला बाजारात होणार लॉन्च

गाडी बाजारात लॉन्च होण्यापूर्वीच काही डिलर्सनी त्याची बुकिंग सुरू केली आहे.

मारूती सुझुकीची इर्टिगा Photo Credits : Indianautosblog)

मारूती सुझुकीची इर्टिगा पुन्हा नव्या अंदाजामध्ये बाजरात येण्यास सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये झालेल्या इंटरनॅशनल मोटार शो 2018 मध्ये नव्या स्वरूपाच्या इर्टिगाची एक झलक पहायला मिळाली होती. या गाडीमध्ये अपग्रेडेशन करून आता नव्या स्वरूपात बाजारात आणण्यासाठी ती सज्ज झाली आहे. 21 नोव्हेंबरला नव्या स्वरूपातील इर्टिग़ा लॉन्च होणार आहे.

कशी असेल नव्या स्वरूपातील इर्टिगा ?

नवी इर्टिगा HEARTECT प्‍लेटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. यापूर्वी स्वीफ्ट, डिझायर, बलेनो आणि इग्निसला या गाड्यादेखील अशाच स्वरूपात बनवण्यात आल्या होत्या. रिअर बंपरचे डिझाईन बदलण्यात आले आहेत. फ्रंट बंपर नव्या स्वरूपात असून त्यामध्ये सी शेपमधील फॉग लॅम्प्स लावण्यत आले आहेत. या गाडीचे बोनेटही अधिक मजबूत आहे. लायसन्स प्लेटमध्ये क्रोमचा वापर करण्यात आला आहे.

कसं असेल इंजिन ?

नव्या स्वरूपातील इर्टिगामध्ये 1.5 लीटर K15B, DOHC, VVT पेट्रोल इंजिन आहे. त्याची सर्वाधिक 104 एचपी पॉवर व 138 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. 5 स्पिड मॅन्युअल ट्रान्समि‍शन आहेत. 4 स्‍पीड टॉर्क कन्‍वर्टर ऑटोमॅटि‍क गि‍अरबॉक्‍स आहे.सध्याच्या मॉडेलमध्ये 1.4 लीटर इंजिन क्षमता असलेली इर्टिगा उपलब्ध आहे.

सेकंड जनरेशनमधील इर्टिगाची किंमत एक्स  शोरूम सुमारे  6.4 लाख ते 10.8 लाख रूपये आहे.