Maruti Baleno Facelift 2019 भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
यामुळे सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या प्रीमियम हॅचबॅकची टक्कर Hyundai Elite i20 आणि Honda Jazz शी होणार आहे.
Maruti Suzuki 2019 Baleno नव्या बोल्ड लूकसह भारतात लॉन्च झाली आहे. Maruti Suzuki ने 2019 Baleno चे 11 वेरिएंट लॉन्च केले आहेत. याच्या बेस वेरिएंटची किंमत दिल्लीच्या एक्स शोरुममध्ये 5.45 लाख रुपये आहे. तर टॉप अँड वेरिएंटची किंमत 8.6 लाख रुपये आहे. तर जाणून घेऊया वेगवेगळ्या वेरिएंटची किंमत आणि फिचर्स....
किंमत
पेट्रोल मॅन्युअल
2019 Baleno पेट्रोल मॅन्युअलमध्ये चार वेरिएंटमध्ये लॉन्च झाली आहे. यात Sigma वेरिएंटची किंमत 5.45 लाख रुपये आहे.
- Delta- 6.16 लाख रुपये
- Zeta- 6.84 लाख रुपये
- Alpha- 7.45 लाख रुपये
पेट्रोल CVT
पेट्रोल CVT- 2019 Baleno CVT तीन वेरिएंटमध्ये लॉन्च झाली आहे. यात
- Delta CVT वेरिएंटची किंमत 7.48 लाख रुपये आहे.
- Zeta CVT- 8.16 लाख रुपये
- Alpha CVT- 8.77 लाख रुपये
डिझेल मॅन्युअल
2019 Baleno डिझेल मॅन्युअलमध्ये चार वेरिएंटमध्ये लॉन्च झाली आहे.
यात Sigma वेरिएंटची किंमत 6.60 लाख रुपये आहे.
- Delta- 7.31 लाख रुपये
- Zeta - 7.99 लाख रुपये
- Alpha-8.60 लाख रुपये
फिचर्स
2019 Baleno, HEARTECT प्लॅटफॉर्मवर काम करेल. यावर मारुती सुझुकीची Ignis आणि नवी Dzire काम करते. Maruti Baleno च्या फेसिलफ्ट व्हर्जनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यातही 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 83bhp च्या मॅक्सिमम पावर आणि 115Nm चे पीक टॉर्क जनरेट करतं. यात डिझेल वेरिएंटमध्ये 1.3 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 74bhp पावर आणि 190Nm चे टॉर्क जनरेट करतं. यात पेट्रोल इंजिन वेरिएंटमध्ये ग्राहकांना CVT ऑटोमॅटिक सिस्टमचा पर्याय देण्यात आला आहे.
Maruti Suzuki 2019 Baleno मध्ये सेफ्टीसाटी ड्युल एअरबॅग्स, ABS सोबत EBD आणि ब्रेक असिस्ट, स्पीड अलर्ट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग असिस्ट सेंसर, ISOFIX चाईल्ड रिस्ट्रेन सिस्टम यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.