Mahindra XUV 3XO Launch in India: महिंद्रा XUV 3XO भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स
यात नवीन डिझाइन केलेले ड्रॉप-डाउन एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, त्रिकोणी इन्सर्टसह नवीन ग्रिल सेक्शन आणि नवीन हेडलॅम्प आहेत.
Mahindra XUV 3XO Launch in India: देशातील आघाडीची स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) उत्पादक महिंद्रा आज आपल्या नवीन कॉम्पॅक्ट SUV Mahindra XUV 3XO चे जागतिक पदार्पण करणार आहे. ही SUV आज संध्याकाळी बाजारात दाखल होणार आहे. मुळात, कंपनीने XUV 300 च्या फेसलिफ्ट आवृत्तीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. आतापर्यंत अनेक टीझरही रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये त्याचा लुक, डिझाइन, फीचर्स आणि मायलेजशी संबंधित सर्व माहिती समोर आली आहे.
एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलचे झाले तर कंपनीने याला स्पोर्टी लूक दिला आहे. यात नवीन डिझाइन केलेले ड्रॉप-डाउन एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, त्रिकोणी इन्सर्टसह नवीन ग्रिल सेक्शन आणि नवीन हेडलॅम्प आहेत. एसयूव्हीचा मागील भागही पूर्णपणे नवीन पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. यात C-आकाराचा LED टेल लॅम्प आहे जो SUV च्या मागील भागाच्या संपूर्ण रुंदीला जोडतो. त्याला कनेक्टेड टेल लॅम्प म्हणतात जो आज खूप ट्रेंडमध्ये आहे. Hyundai आणि Kia मॉडेल्समध्येही तुम्हाला असेच टेल लॅम्प्स मिळतील. (हेही वाचा -Toyota ने लॉन्च केली Innova Hycross GX (O) Variant; इथे पहा त्याच्या किंमती)
Mahindra XUV 3XO ची वैशिष्ट्ये -
कंपनी आपल्या केबिनला प्रीमियम टच देखील देईल, त्यात नवीन डिझाइन केलेले डॅशबोर्ड, एक मोठी 10.25' इंफोटेनमेंट सिस्टम आणि सराउंड साउंड स्पीकर असण्याची अपेक्षा आहे. या SUV मध्ये रिमोट क्लायमेट कंट्रोल फीचर देखील दिले जात आहे जे Adrenox ॲप वरून ऑपरेट होईल. याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरूनच कारच्या केबिनचे तापमान नियंत्रित करू शकाल.
XUV 3XO ला कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील सर्वात मोठा सनरूफ मिळेल. म्हणजे कारच्या आतून दिसणारे मोकळे आकाश आणखीनच भव्य असेल. यात हरमन कार्डोनची उत्कृष्ट ऑडिओ सिस्टीम असेल, जी 7 स्पीकरने सुसज्ज असेल. मनोरंजनाच्या दृष्टीने हे वैशिष्ट्य खूपच चांगले आहे. याशिवाय वायरलेस ऍपल कार प्ले/अँड्रॉइड ऑटो, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये देखील कारमध्ये असणार आहेत. (Tesla-Tata Semiconductor Chips Deal: टाटा कंपनी टेस्लासाठी बनवणार सेमीकंडक्टर चिप्स; Elon Musk यांच्या भारतभेटीआधी दोन्ही कंपन्यांमध्ये मोठा करार)
ही SUV 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनसह बाजारात आणली जाऊ शकते. नवीन XUV 3XO अंदाजे 20.1 किलोमीटरचे मायलेज देईल. याशिवाय, ही SUV फक्त 4.5 सेकंदात 0 ते 60 किमी/ताशी वेग घेईल. अलीकडेच कंपनीने याचा आणखी एक टीझर जारी केला आहे. ज्यामध्ये त्याच्या केबिन फीचर्ससह मायलेजही समोर आले होते. त्यानुसार ही SUV 20.1 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देईल. बाजारात ही एसयूव्ही मारुती ब्रेझा आणि टाटा नेक्सॉन सारख्या कारशी टक्कर देईल.
पहा व्हिडिओ -
Mahindra XUV 3XO ची किंमत -
वाहनाला मिळालेले सर्व अपडेट्स विचारात घेतल्यास, Mahindra XUV 3XO ची किंमत रु. 8.50 लाख ते रु. 16 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. नवीन डिझाईन, अत्याधुनिक फीचर्स आणि स्पोर्टी लूकमुळे ही एसयूव्ही तरुणांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे.