IPL Auction 2025 Live

Mahindra XEV 9e & BE 6e Launched in India: महिंद्राने भारतात लॉन्च केल्या आपल्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

त्यांची डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. बुकिंग लवकरच सुरू होईल. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर कारची ऑनलाइन बुकिंग करू शकतील.

Mahindra XEV 9e & BE 6e Launched in India

Mahindra XEV 9e & BE 6e Launched in India: भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक कारची (Electric Cars) लोकप्रियता हळूहळू वाढत आहे. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक त्यांचे नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) ग्रुपही मागे नाही. महिंद्रा कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली दोन नवीन इलेक्ट्रिक वाहने- Mahindra BE 6e आणि Mahindra XEV 9e SUV लाँच केली आहेत. दोन्ही एसयूव्ही कंपनीच्या नवीन INGLO EV प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. या गाड्या बाजारात टाटासह अनेक कंपन्यांशी स्पर्धा करू शकतात. दोन्ही एसयूव्ही 3 प्रकारात उपलब्ध असतील. मात्र, सध्या पॅक 1 मॉडेलची किंमत जाहीर करण्यात आली आहे. ही वाहने महिंद्राच्या ‘अनलिमिट इंडिया’च्या व्हिजनला मूर्त रूप देतात.

जानेवारीपासून या एसयूव्ही बाजारात उपलब्ध होऊ शकतात. त्यांची डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. बुकिंग लवकरच सुरू होईल. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर कारची ऑनलाइन बुकिंग करू शकतील.

Mahindra BE 6e-

महिंद्राची ही पहिली कॉम्पॅक्ट बीईव्ही आहे. त्याची सुरुवातीची किंमत 18.9 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही एक कूप एसयूव्ही आहे, जी 20 इंच चाके, मागील एलईडी लाइट बार आणि 45 लिटर ट्रंकसह येते. याची लांबी 4371 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 207 मिमी आहे. कारमध्ये 59kWh आणि 79kWh बॅटरी पॅक पर्याय आहेत. ते कमाल 500 किमीची रेंज देऊ शकते. 288bhp पॉवरट्रेन आणि 380Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ते 6.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. याला 20-80% चार्ज होण्यासाठी 20 मिनिटे लागतात. एसव्हीयूमध्ये मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, मल्टीपल ड्राइव्ह मॉडेल्स, वायरलेस फोन चार्जिंग, हाय-एंड इन्फोटेनमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, ADAS, पॅनोरमिक सनरूफ यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Mahindra XEV 9e-

XEV 9e ची सुरुवातीची किंमत 21.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. यात शक्तिशाली इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन, जलद चार्जिंग सपोर्ट आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये आहेत. शहरी वाहनचालक आणि लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे वाहन उत्तम पर्याय आहे. या इलेक्ट्रिक एसव्हीयूला नवीन फ्रंट आणि रियर बंपर मिळतात. XEV 9e मध्ये 59kWh बॅटरी आहे, जी 228bhp पॉवर आणि 380Nm टॉर्क जनरेट करते. हे वाहन फुल चार्ज केल्यावर 656 किमीची रेंज देते. 140kW DC फास्ट चार्जर वापरून बॅटरी फक्त 20 मिनिटांत 20-80% चार्ज केली जाऊ शकते. ही SUV फक्त 6.8 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. XEV 9e ची रचना अतिशय आकर्षक आणि आधुनिक आहे. साइड प्रोफाइलमध्ये स्लोपिंग रूफलाइन, एरोडायनामिक ॲलॉय व्हील आणि प्रीमियम फ्लश-फिटिंग डोअर हँडल्स आहेत. (हेही वाचा: Ola Electric Launches Gig, S1 Z Sooters: ओला इलेक्ट्रिकने लाँच केली गिग आणि एस1 झेड इलेक्ट्रिक स्कूटर; सुरुवातीची किंमत 39,999 रुपये, आजपासून बुकिंग सुरू)

यात 2-स्पोक स्टीयरिंग व्हील, लेयर्ड डॅशबोर्ड आणि ट्रिपल-स्क्रीन सेटअप आहे. पॅनोरामिक सनरूफ, मल्टीकलर प्रकाश व्यवस्था, क्रूझ कंट्रोल, 10.25-इंच टचस्क्रीन, हवेशीर जागा, म्युझिक सिस्टम आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, हे वाहन 6 एअरबॅग्ज, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), लेव्हल-2 ADAS आणि 360-डिग्री कॅमेरासह येते. महिंद्राची ही नवी एसयूव्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत नवी क्रांती आणेल, असा विश्वास आहे.