Kia Seltos भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, फिचर्स, मायलेज; Hyundai Creta ला देणार टक्कर

दमदार इंजिन क्षमता असलेली आणि दिसण्यास अत्यंत देखणी अशी ही एसयुव्ही भारतीय बाजारात 9.69 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते, असे एका शोरुमने म्हटले आहे.

Kia Seltos (Photo Credits: Kia Motors India)

Kia Seltos Price & Features in India: दक्षिण कोरिया देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी Kia Motors ने भारतीय बाजारात आपली बहुचर्चीत कार लॉन्च केली आहे. Kia Seltos कारच्या रुपात Kia Motors ही पहिल्यांदाच भारतीय बाजारात एसयूव्ही लाँच करत आहे. दमदार इंजिन क्षमता असलेली आणि दिसण्यास अत्यंत देखणी अशी ही एसयुव्ही भारतीय बाजारात 9.69 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते, असे एका शोरुमने म्हटले आहे.ही एसयुव्ही कंपनीने दो ट्रिममध्ये भाजारात सादर केली आहे. ज्यात GT Line आणि HT Line चा समावेश आहे.

इंजिन क्षमता

Kia Motors कंपनीने Kia Seltos ही एसयुव्ही तीन वेगवेगळ्या इंजिनसोबत लॉन्च केली आहे. ज्यात 1.5 लीटर क्षमतेचे नॅचरली एक्पायर्ड इंजिनचाही समावेश आहे. हे इंजिन 115hp ची पॉवर आणि 144Nm डे टॉर्क जेनरेट करते. याशिवाय दुसऱ्या प्रकारातील इंजिन 1.4 लीटर क्षमतेचे टर्बो चार्ज पेट्रोल इंजन आहे. जे 140hp ची पॉवर आणि 242Nm चा टॉर्क जेनरेट करते. डीजिटल व्हेरिएटमध्ये कंपनीने 1.5 लीटर क्षमतेचे इंजिन वापरले आहे. हे इंजीन 115hp ची पॉवर आणि 250Nm चा टॉर्क जनरेट करते. हे इंजीन बीएस 6 मानकांनुसार तयार करण्यात आल आहे.

या एसयुव्हीमध्ये 6 स्पीड गियरबॉक्स चे स्टॅंडर्ड ठेवण्यात आले आहे. ज्यात 1.5 लीटर पेट्रोल व्हेरिएटमध्ये कंपनीने CVT ट्रान्समिशनचा वापर केला आहे. याला कंपनीने IVT असे नाव दिले आहे. हे डिझेल इंजिन कंपनीने 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर आणि टर्बो व्हेरिएंटमध्ये कंपनीने 7 सपीड डुअल क्लच ट्रान्समिशन गियरबॉक्स सहभागी केले आहे.

मायलेज

कंपनीचा दावा आहे की, नव्या Kia Seltos चा पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 16.5 किलोमीटर आणि ऑटोमेटिक व्हेरिएंट 16.1 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते. तर, डीजेल मॅन्युएल व्हेरिएंट 21 किलोमीटर प्रतिलीटर आणि ॉटेमेटिक व्हेरिएंट 18.0 किलोमीटर प्रतिलीटर इतके मायलेज देते.

फिचर्स

कंपनीने या एसयुव्हीची डिलिव्हरीही सुरु केली आहे. या एसयुव्हीच्या टॉप व्हेरिएंटमध्ये कंपनीने 10.2 टच स्क्रिन इन्फोटेंमेंट सिस्टम दिली आहे. याशिवाय वेंटिलेटेड फ्रंट सीट, पॉवर ड्रायव्हर सीट, 8 स्पीकर, Bose ऑडिओ सिस्टम, हेड अप डिस्प्ले, फ्रंट पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रिक सन रुप, एअर प्युरीफायर, परफ्यूम डिफ्यूजर आणि UVO कनेक्टिविटी सिस्टम देण्यात आली आहे. (हेही वाचा, Hyundai Grand i10 Nios झाली लॉन्च; पहा या दमदार गाडीची फीचर्स, किंमत काय?)

सेफ्टी फिचर्सबाबत सांगायचे तर 6 एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कंट्रोल, व्हीकल स्टॅबिलीटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट एसिस्ट, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर, ब्लाईंट स्पॉट मॉनिटर यांसारखे अेक फिचर्स देण्यात आले आहेत. हे फिचर्स एसयुव्हीला अधिकच सुरक्षीत आणि दमदार बनवत आहेत.

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, Kia Seltos ला कंपनीने दोन ट्रममध्ये लॉन्च केले आहे. जे पेट्रोल आणि डिझेल अशा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेत. HT Line पेट्रोल व्हिरिएंटची सुरुवातीची किंमत 9.69 लाख रुपये आहे. तर, यातीलच डिझेल व्हेरिएंटची किंमत 9.99 लाख रुपये इतके आहे. याशिवाय GT Line केवळ पेट्रोल इंजिनमध्येच उपलब्ध आहे. ज्याची सुरुवात 13.49 लाख रुपये असल्याचे समजते. विविध शोरुममधील या एसयुव्हीच्या दरात बदल असू शकतो.