IRDA तर्फे खाजगी वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढणार,विद्युत वाहनांसाठी विशेष सवलत

यामध्ये विद्युत वाहनांना विशेष सवलत देण्यात आली आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

खाजगी वाहनांसाठीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance)  चालू आर्थिक वर्षातच वाढवण्याचा प्रस्ताव आयआरडीए (IRDA) तर्फे मांडण्यात येतोय. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1  एप्रिल ला इन्शुरन्सचे प्रीमियम दर वाढविले जातात मात्र या वर्षी अद्याप मागील वर्षीचे दरच कायम ठेवण्यात आले होते. सोमवारी आयआरडीए ने जाहीर केलेल्या प्रस्तावानुसार आता हे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआरडीएच्या माहितीनुसार, चार चाकी व दुचाकी वाहनांसाठी हे नवे प्रीमियम दर येत्या काळात लागू करण्यात येणार असून ज्या गाड्यांचा तीन ते पाच वर्षांचा विमा अगोदरच काढण्यात आला आहे त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही.

असे असतील वाढलेले प्रीमियम दर

आयआरडीए च्या नव्या प्रीमियम दरानुसार, 1000 सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या चार चाकी वाहनांच्या प्रीमियम मध्ये 14.5 टक्के वाढ करण्यात येणार आहे ज्यामुळे अगोदर 1,850 रुपये किमतीच्या प्रीमियमसाठी आता 2120 रुपये भरावे लागणार आहेत. तर 1000ते 1, 500 सीसी इतकी कार्यक्षमता असणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी 3,300 किमतीचा प्रीमियम भरावा लागणार आहे यापूर्वी हा दर 2863 इतका होता. मात्र 1500 सीसीपेक्षा अधिक कार्यक्षमता असणाऱ्या गाड्यांचा प्रीमियम पूर्वीचाच म्हणजे 7,890 इतकाच ठेवण्यात आला आहे.

या तुलनेने दुचाकी वाहनाच्या प्रीमियमची दरात तितकीशी वाढ करण्यात आलेली नाही. यापुढे 75  सीसी इतकी कार्यक्षमता असलेल्या दुचाकींसाठी अगोदर असलेल्या 427 रुपये किमतीच्या ऐवजी 585 रुपयांचा प्रीमियम भरावा लागणार आहे तर 350 सीसी पेक्षा अधिक कार्यक्षम दुचाकींसातिच्या प्रीमियम मध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. वाहनाचा विमा काढा नाहीतर वाहनांवर येणार जप्ती, दिवाकर रावते यांचा इशारा

विद्युत वाहनांना मिळणार सवलत

प्रदूषणावर नियंतर्ण आणण्यासाठी विद्युत वाहनांचा वापर कार्याचे आवाहन वारंवार केले जात असते याकरिता वेगवेगळ्या सवलतीच्या योजना देखील सरकारतर्फे आणल्या जातात . याचप्रमाणे विद्युत वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियम दराच्या वाढीत देखील पंधरा टक्के सूट देण्यात येईल तर तूर्तास ई- रिक्षांसाठी दरात कोणतीच दरवाढ केली जाणार नाही. Electric Vehicles वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! 'हिरव्या नंबर प्लेट' सोबत मिळणार या सवलती

 

याचप्रमाणे अन्य वाहनाच्या कार्यक्षमतेनुसार येत्या काहीच दिवसात प्रीमियमच्या दरात वाढ करण्यात येळ. याबाबत आयआरडीए 29 मे पर्यंत तज्ज्ञांची मते जाणून घेईल व साधारणपणे 1  जून पासून हे नवे दर लागू कारण्यात येतील असे सूत्रांकडून समजत आहेत.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 1st Test 2024 Day 2 Preview: दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला ऑलआऊट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार इंग्लंडचा संघ, त्याआधी सामन्याबद्दल जाणून घ्या संपूर्ण तपशील

New Zealand vs England 1st Test 2024 Day 2 Live Streaming: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला कधी होणार सुरुवात? भारतात थेट सामन्याचा कधी अन् कुठे घेणार आनंद? येथे जाणून संपूर्ण तपशील

Air India Pilot Srishti Tuli Death Case: एअर इंडिया पायलट सृष्टी तुली हिची आत्महत्या नव्हे हत्या झाली; कुटुंबीयांचा आरोप

दुचाकी चालक आणि चालकामागे बसणार्‍याला हेल्मेट न घालणं आता पडणार महागात; महाराष्ट्र पोलिसांकडून नियमाच्या कडकपणे अंमलबजावणीचे निर्देश, पुण्यातही विशेष मोहिम