FASTag KYC Status Deadline: फास्टटॅग ची केवायसी आजचं करा पूर्ण अन्यथा होईल निष्क्रिय; पहा तुमचं KYC Status कसं तपासाल?
FASTag- एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली- महामार्गांवर टोल गोळा करते ज्यामुळे टोल प्लाझावर टोल टॅक्स भरणे अधिक सोपे होते.
National Highways Authority of India कडून "One Vehicle, One FASTag" प्रोग्राम जाहीर केला आहे. याद्वारा टोल जमा करण्याची प्रक्रिया अधिक सुकर होणार आहे. तसेच फास्ट टॅगचा गैरवापर देखील टाळता येणार आहे. NHAI ने आता FASTags मध्ये KYC करणं बंधनकारक केले आहे. आता जर हे केवायसी पूर्ण केले नसेल तर 31 जानेवारी नंतर फास्टटॅग ब्लॉक केले जातील. यासाठी आरबीआय कडून गाईडलाईन्स देखील देण्यात आल्या आहेत. हे देखील नक्की वाचा: FASTag Smart Watch Scam Fact Check: स्मार्ट घड्याळ घालून विंडस्क्रीन साफ करताना मुलाने पेटीएम फास्टॅगमधून पैसे काढण्याचा केला प्रयत्न, जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य.
तुमच्या फास्ट टॅगचं स्टेटस कसं तपासाल?
- fastag.ihmcl.com ला भेट द्या.
- तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड किंवा ओटीपी द्वारा लॉगिन करा.
- डॅशबोर्ड वर माय प्रोफाईल वर जाऊन तुमचं केवायसी स्टेटस पहा.
जर केवायसी अपूर्ण असेल तर काय कराल?
- "My Profile" मध्ये जाऊन 'KYC'सबसेक्शन पहा.
- आता 'KYC,'वर जाऊन तुमचा "Customer Type," निवडा. त्यामध्ये आवश्यक माहिती भरा. यासाठी गरजेचे ID Proof आणि Address Proof ची कागदपत्र भरा.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा. त्यानंतर अॅड्रेस प्रुफ नुसार पत्ता भरा. सारे तपशील तपासून पहा आणि केवायसी व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.
FASTag KYC साठी वाहन नोंदणी प्रमाणपत्र, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
फास्टटॅग नेमकं काय आहे?
FASTag- एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली- महामार्गांवर टोल गोळा करते ज्यामुळे टोल प्लाझावर टोल टॅक्स भरणे अधिक सोपे होते. हा टॅग कारच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. जो बँक खाते किंवा प्रीपेड कार्डशी जोडलेला असतो. जेव्हा FASTag असलेली कार टोल बूथजवळ येते तेव्हा ते RFID तंत्रज्ञान वापरते. स्कॅनर टॅग स्कॅन करतो आणि टोलचे पैसे कापले जातात.