Online (Ola, Uber & Meru) Taxi Service: सुखद प्रवासासाठी ओला, उबर आणि मेरु यांसारख्या ऑनलाईन टॅक्सी सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी कसे कराल बुकींग?

सध्या कोविड-19 संकटामुळे सार्वजनिक वाहतुक बंद असल्याने ऑनलाईन टॅक्सी सेवांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन टॅक्सी कशी बुक करायची ते जाणून घेऊया...

Online Taxi Service (Photo Credits: Pixabay)

How to Book Ola, Uber or Meru Cab: आजकाल सुखद प्रवासासाठी ओला, उबर, मेरु यांसारख्या टॅक्सी सेवांचा लाभ घेतला जातो. सध्या कोविड-19 संकटामुळे सार्वजनिक वाहतुक बंद असल्याने ऑनलाईन टॅक्सी सेवांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या ऑनलाईन टॅक्सी सेवांच्या माध्यमातून लोकल किंवा 500-600 किमी पर्यंतचा प्रवास करण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र ऑनलाईन टॅक्सी कशी बुक करायची ते जाणून घेऊया. ऑनलाईन कॅब बुक करण्याचा सोपा मार्ग म्हणजे मोबाईल. कुठेही असलात तरी मोबाईलद्वारे तुम्ही ही सेवा अगदी सहज बुक करु शकता. तसंच कम्प्युटर, लॅपटॉपद्वारेही तुम्ही या सेवेचा तात्काळ लाभ घेऊ शकता. तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...

ओला, उबर किंवा मेरु कॅब बुक करण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. ओला, उबर, मेरु यापैकी तुम्हाला कोणत्या कंपनीनची टॅक्सी सेवा हवी आहे तो अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करा. लॅपटॉप किंवा वेबसाईटवरुन कॅब बुक करत असला तर तुम्हाला कॅब कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. अॅप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबरद्वारे लॉगईन करा. अकाऊंट तयार झाल्यानंतर होमपेजवरुन तुम्हाला कॅब बुकिंगचा पर्याय दिसेल. त्यानंतर वर असलेल्या Pick वर क्लिक करुन तिथे जेथून प्रवासाला सुरुवात करणार आहात त्या जागेचे नाव टाईप करा. पिक अप लोकेशन सेट झाल्यानंतर ड्रॉप लोकेशन भरा. म्हणजे तुम्हाला जिथे जायचे आहे त्या जागेचे नाव.

त्यानंतर तुम्हाला खाली Rentals /Micro /Mini /Prime /Taxi /Auto /Outstation यांसारखे पर्याय दिसतील. त्याच्याखाली प्रवासासाठी लागणारा वेळ दिसेल. त्यातील तुमच्या सोयीचा प्रर्याय निवडा आणि राईड नाऊ वर क्लिक करा. हे झाल्यानंतर तुम्हाला प्रवासाचे टॅक्सी भाडे स्क्रिनवर दिसेल. त्यासोबत तीन पर्याय दिसतील. Personal, Set up payment और Apply Coupon. आता या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेऊया.

Personal: पर्सनल म्हणजे स्वतःसाठी खाजगी कॅब बुक करणे. Share म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रवास करणे. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला Person हा पर्याय दिसेल. म्हणजेच प्रवासादरम्यान किती व्यक्ती तुमच्यासोबत असाव्यात याची निवड तुम्ही करु शकाल.

Set up payment: यावर क्लिक केल्यावर तुम्हाला भाडे भरण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय दिसतील. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कॅश, paytm किंवा इतर पर्यायांनी पेमेंट करु शकता.

Apply Coupon: ओला, उबर आणि मेरु कॅब द्वारे अनेकदा मेसेजच्या माध्यमातून कूपन पाठवतात. याचा वापर केल्यास त्यातील रक्कमेची सूट तुम्हाला मिळेल. जर तुमच्याकडे कोणतेच कूपन नसेल तर कन्फर्म बुकिंग (Confirm Booking)पर्यायाची निवड करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळील कॅब ड्राईव्हरचा गाडी आणि मोबाईल नंबर मिळेल. तसंच बुक केलेली कॅब किती मिनिटांवर आहे, हे देखील तुम्ही पाहू शकाल. तसंच काही समस्या असल्यास तुम्ही आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता. विशेष म्हणजे ओला कॅब बुकिंग केल्यानंतर एक ओटीपी पाठवण्यात येतो. कॅबमध्ये बसल्यानंतर तो ओटीपी तुम्हाला ड्रायव्हर सोबत शेअर करावा लागेल.

विशेष म्हणजे याच कंपन्यांची ऑटो रिक्षा आणि बाईक सर्व्हिसेस देखील उपलब्ध आहे. याची माहिती देखील तुम्हाला अॅप, वेबसाईटवर मिळेल.