होंडा कंपनीची नवी Activa 125 BS6 लॉन्च, जाणून घ्या खासियत आणि किंमत
BS6 Honda Activa 125 मध्ये अपडेटेड इंजिनसह नवे फिचर्ससुद्धा जोडण्यात आले आहेत.
होंडा (Honda) कंपनीने बुधवारी (11 सप्टेंबर) देशातील पहिली बीएस 6 टू-व्हीलर Activa 125 लॉन्च केली आहे. BS6 Honda Activa 125 मध्ये अपडेटेड इंजिनसह नवे फिचर्ससुद्धा जोडण्यात आले आहेत. त्याचसोबत अॅक्टीव्हाचा लूकमध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे. तर बीएस4 (BS4) या मॉडेलला नवी अॅक्टिव्ही रिप्लेस करणार आहे.
नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या या अॅक्टीव्हाची डिझाइन बीएस4 सारखाच आहे. परंतु त्याला नवा लूक देण्यासाठी काही बदल केले आहेत. पुढील बाजूस अॅप्रन आणि साइड पॅनल्सवर क्रोम इंटर्ट्स देण्यात आले आहेत. तसेच नवी एलईडी हेडलाइट आणि वायजरसह अॅप्रन डिझायनमध्ये बदलाव करण्यात आला आहे. त्याचसोबत या अॅक्टीव्हासाठी नॉइजलेस स्टार्टर, आयडल स्टार्ट-स्टॉप सिस्टम, अतिरिक्त फ्युल फिलर कॅप आणि पास लाइट स्विच सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.(इलेक्ट्रिक स्कुटर Gemopai Astrid Lite लॉन्च, एकदा चार्ज केल्यावर 90 किमी धावणार)
Tweet:
स्कुटरला साइड सॅन्ड खाली करण्यासाठी एक इंडिकेटर देण्यात आले आहे. त्यामुळे सॅन्ड खाली असल्यास स्कुटर सुरु होणार नाही आहे. तसेच रियल टाइम मायलेजसह अन्य काही सुविधा सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये 124cc, फ्युल इंजेक्टेड इंजिन दिले आहे. हे इंजिन 6,500rpm वर 8.1 bhp पावर आणि 5,000 rpm वर 10.3 Nm पीक टॉर्क जनरेट करतो. इंजिनच्या आतील काही पार्ट्समध्ये बदलाव करण्यात आले आहेत. त्यामुळे कंपनीने असे म्हणणे असे आहे की, इंजिन अधिक उत्तमरित्या असणार आहे. तर नव्या या अॅक्टीव्हाची किंमत 67490 हजारापासून ते 74490 रुपयापर्यंत ठेवण्यात आली आहे. येत्या 28 सप्टेंबर पासून ग्राहकांना होंडा कंपनीची ही नवी अॅक्टीव्हा खरेदी करता येणार आहे.