एप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित
यामुळे कॅबमध्ये महिलांचा प्रवास देखील अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
सरकारने 1 एप्रिल 2019पासून साऱ्या वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक केलं आहे. नव्या नियमांनुसार 2019 सालामध्ये देशभरात विकल्या जाणाऱ्या वाहनांवर डीलर्स कडूनच ही प्लेट लावण्यात येणार आहे. High Security Number Plates मुळे कार, स्कुटर, टॅक्सी, कॅब, ट्रक यासारख्या वाहनांचं ऑनलाईन ट्रॅकिंग (Online Tracking) करणं सुकर होणार आहे. यामुळे कॅबमध्ये महिलांचा प्रवास देखील अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
सडक परिवहन मंत्रालयाने 4 डिसेंबर रोजी नव्या वर्षात 1 एप्रिल पासून लावणं बंधनकारक असल्याची अधिसूचना जारी केली होती. सरकारने देखील सारे सूचनांचा विचार करता आगामी वर्षात १ एप्रिल पासून हा नियम बंधनकारक करण्याचे ठरवले आहे. प्लेट लावल्यानंतरच नव्या गाडयांना शोरूम मधून बाहेर काढण्याची परवानगी देण्यात यावी असे अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. तसेच आवश्यकतेनुसार जुन्या गाडयांना डीलर्स नंबर प्लेट उपलब्ध करून देऊ शकतात. 2001 मध्येदेखील अशाप्रकारे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्या वेळेस कोर्टात आव्हान देऊन कार कंपन्यांनी हा नियम मोडीत काढला होता.
High Security Number Plates कसं करणार काम ?
हाई सिक्योरिटी प्लेट (High Security Number Plates ) डायनॅमिक स्वरूपाची असेल. यावर आधारित एक चिप असेल. यांच्या मदतीने पोलीस कंट्रोल रम किंवा परिवहन कार्यालयातून गाडी ट्रॅक करू शकतात. ड्युप्लिकेट नंबर प्लेट बनवण्यापासून लोकांना रोखण्यासाठी यामध्ये लेजर मार्क आणि होलोग्राम सारखे सुरक्षेचे उपाय देण्यात आलेले आहेत.