Hero Destini 125 स्कूटर भारतात लॉन्च ; हे आहेत फिचर्स

हे पाहताच हिरोने देखील या सेगमेंटमध्ये नवे प्रॉडक्ट सादर करण्याचा निर्णय घेतला.

हिरो डेस्टीनी 125 (File Photo)

Hero MotoCorp या भारतातील आघाडीच्या डू व्हिलर कंपनीने 125 सीसीची नवी स्कूटर आज भारतात लॉन्च झाली. ऑटो एक्सपो 2018 मध्ये या स्कूटरला हिरो मोटोकॉर्पने Duet 12 नावाने सादर केली होती. आता हिचे नाव बदलून  Hero Destini 125 ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी 125 सीसी सेगमेंट असलेल्या स्कूटर्सची लोकप्रियता खूप वाढली होती. हे लक्षात घेत हिरोने देखील या सेगमेंटमध्ये नवे प्रॉडक्ट सादर करण्याचा निर्णय घेतला.

हिरो डेस्टीनी 125 स्कूटर 110 सीसी डुएटवर आधारीत आहे. यात कॉस्मेटिक बदल करण्यात आले असून स्कूटरला नवा लूक देण्यात आला आहे. यात क्रोम एक्सेंट्ससोबत नवीन फ्रंट ऐप्रॉन आणि कर्वी बॉडी पॅनल देण्यात आले आहे. नवीन स्कूटरमध्ये 125 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 6750 rpm वर 8.7 bhp पावर आणि 5000 rpm वर 10.2 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. फ्यूल एफिशिएंसी वाढवण्यासाठी हिरोने पहिल्यांदा या स्कूटरमध्ये i3S सिस्टम ( idle-start-stop-system) दिली आहे.

याशिवाय हिरो डेस्टीनी 125 मध्ये ऑप्शनल फ्रंट डिस्क ब्रेक, इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (आयबीएस), साइड स्टँड इंडीकेटर, सर्व्हीस रिमायंडर, पास स्विच आणि एक्टर्नल फ्यूल फिलिंगसारखे फिचर्स दिले आहेत. नवीन हिरो स्कूटर आता होंडा ग्राजिया, सुझूकी एक्सेस, होंडा अॅक्टीव्हा 125, टीव्हीएस अनटॉर्क 125, वेस्पा वीएक्स आणि अप्रिलिया एसआर 125 यांसारख्या स्कूटर्सला टक्कर देईल. या स्कूटरची किंमत 52,000 आणि  55,000 रुपयांदरम्यान असल्याचे बोलले जात आहे.

इंधन भरण्यासाठी रिमोट चावी ओपनिंग, मोबाईल चार्जिंग पोर्ट आणि बूट लाईट  या सुविधा स्कूटरमध्ये देण्यात आल्या आहेत.