Gudi Padwa 2019 Offers on Bikes & Scooters: गुढीपाडव्या निमित्त होंडा अॅक्टीव्हा 5G, सुझुकी गिक्स्कर, यामहा R15 V3 यांच्यासह 'या' बाईक्सवरही मिळवा 7000 रुपयांपर्यंत सूट

या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते

Gudi Padwa 2019 Offers on Bikes & Scooters (Photo Credits: File Photo)

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडवा सणानिमित्त लोकांमध्ये नव्या वस्तू खरेदी करण्याचा उत्साह असतो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे घर, बाईक, कार, दागिने अशा वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. मग यंदा गुढीपाडव्या निमित्त नवीकोरी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्स अवश्य जाणून घ्या.

गुढीपाडव्या निमित्त विविध बाईकवर उपलब्ध असलेल्या खास ऑफर्स:

यामहा R15 V3.0: यामाहा आर 15 व्ही 3.0 चे 2018 चे एडिशन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 4000 रुपये आणि आकर्षक आर्थिक योजनांसह खास सूट मिळू शकेल. गुढी पाडवा 2019 निमित्त बाईकवर ही खास ऑफर दिली जात आहे. ही खास योजना डीलरशिप पातळीवर दिली जाते आणि ती डीलर ते डीलरमध्ये बदलली जाईल.

यामाहा फास्कीनोः यामाहा फास्कीनो या आणखी एका बाईकवर आकर्षक ऑफर दिली जात आहे. या ऑफरअंतर्गत ज्यामध्ये ग्राहकांना पूर्ण टँकसह स्कूटर घरी घेऊन जाण्याची संधी मिळेल. मात्र ही ऑफर शहरातील निवडक विक्रेत्यांपर्यंत मर्यादित आहे आणि डीलरशिप स्तरावर बदलू शकते. फॅस्किनो स्कूटर गार्ड, नंबर प्लेट आणि पार्किंग कव्हरसारख्या विनामूल्य उपकरणासह दिली जाईल.

सुझुकी गिक्स्कर: जपानी बाईक निर्मिती असलेल्या सुझुकी गिक्स्कर ही लोकप्रिय मोटारसायकल आहे. यावर 7000 रूपये सवलत मिळते. गुढी पाडवा निमित्त डिलरशीपवर असलेल्या विशेष ऑफर अंतर्गत अॅक्सेसरीजवर विशेष डिल्स देण्यात आले आहेत. ही बाईक खरेदी केल्यास लेक्स गार्ड, पॅक कव्हर आणि पार्किंग कव्हर या बाईक अॅक्सेसरीज ग्राहकांना मोफत मिळतील.

होंडा अॅक्टीव्हा 5 जी: नवीन होंडा अॅक्टीव्हा 5 जी स्कूटर विकत घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही उत्तम संधी आहे. कारण गुढी पाडव्या निमित्त कंपनीने खास ऑफर्स सुरु केल्या आहेत. इच्छुक ग्राहकांना 1,100 रुपये, कमी किंमतीचे ईएमआय आणि 2000 रुपयांचे एक्सचेंज बोनस मिळू शकतात. शिवाय, आकर्षक ऑफर्स एचडीएफसी बँकेकडून देखील देण्यात येत आहेत.