Electric Vehicles Rise: 2025 पर्यंत जगभरात 85 दशलक्ष ईव्ही वाहने रस्त्यावर धावणार; भारतात ईव्ही वाहनांची संख्या 5 लाखांवर जाण्याची शक्यता - रिपोर्ट
त्याआधारावर जागतिक स्तरावर 2025 च्या अखेरीस किमान 85 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावण्याची शक्यता एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
Electric Vehicles Rise: जागतिक स्तरावर 2025 च्या अखेरीस किमान 85 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. विविध सरकारी प्रोत्साहनांमुळे भारतात(India) येत्या काळात 2025 पर्यंत 500,000 इलेक्ट्रिक वाहनेचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा केली आहे, असे मंगळवारी एका अहवालात म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत ईव्ही मार्केटवर वाईट परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या. मात्र, गार्टनरच्या अंदाजानुसार 2024 मध्ये जागतिक स्तरावर ईव्हींची संख्या एकूण 64 दशलक्ष युनिट्स असेल आणि 2025 मध्ये 33 टक्क्यांनी वाढेल.
"ईव्ही वाहने लोकांच्या पसंतीस उतरतील का याचा अंदाज न लागल्यामुळे बऱ्याच कंपन्यांनी नवीन ईव्ही मॉडेल्स लॉन्च करण्यास उशीर केला," गार्टनरचे जोनाथन डेव्हनपोर्ट म्हणाले. जागतिक स्तरावर, बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा (BEV) वापर पुढील वर्षाच्या अखेरीस सुमारे 62 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ही वाढ 2024 च्या तुलनेत 35 टक्क्यांनी आधिक असेल. (हेही वाचा: Tesla ‘Cybercab’ Robotaxi: टेस्लाचे मालक Elon Musk ने केले सायबरकॅब सेल्फ-ड्रायव्हिंग रोबोटॅक्सीचे अनावरण; मानवी हस्तक्षेपाशिवाय चालणार गाडी, जाणून घ्या फीचर्स व किंमत)
प्लग-इन हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (PHEV) ची किंचित कमी दराने वाढ होण्याची शक्यता आहे. 2024 च्या तुलनेत या वाहनांत 28 टक्क्यांनी तर 2025 मध्ये 23 दशलक्ष युनिट्सच्या बेसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतात, 2025 च्या अखेरीस 500,000 इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर येण्याची अपेक्षा आहे. वापरात असलेल्या बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांची एकूण संख्या 370,000 युनिट्स असण्याची अपेक्षा आहे. तर 2025 च्या अखेरीस 129,500 प्लग-इन हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल्स रस्त्यावर येण्याची अपेक्षा आहे,' असे अहवालात म्हटले आहे.