Dual Airbags Compulsory In All New Cars: येत्या 1 एप्रिलपासून कारच्या पुढील दोन्ही सीट्सवर Airbags असणे अनिवार्य
कारमध्ये दोन्ही सीट्सवर जर एअरबॅग्स असतील तर अपघाताप्रसंगी या एअरबॅग्समुळे प्रवशांचे प्राण वाचवतील.
दिवसेंदिवस कार अपघाताच्या घटना वाढत चालल्यामुळे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) 1 एप्रिल 2021 मध्ये नवे बदल केले आहेत. ज्यानुसार, वाहनचालक आणि त्याच्या बाजूच्या सीटवर एअरबॅग (Airbags) असणे अनिवार्य करण्यात येणार आहे. जुन्या वाहनांच्या संदर्भात, 31 ऑगस्ट 2021 पासून, सध्याच्या मॉडेल्समध्ये ड्रायव्हरच्या सीटसह एअरबॅग देणं बंधनकारक असेल. कारमध्ये दोन्ही सीट्सवर जर एअरबॅग्स असतील तर अपघाताप्रसंगी या एअरबॅग्समुळे प्रवशांचे प्राण वाचवतील.
या नव्या नियमामुळे वाहनांच्या किंमतीत 5000-7000 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 1 एप्रिल 2021 पासून नवीन वाहनांसाठी आणि 1 जून 2021 पासून जुन्या वाहनांसाठी डबल एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, जुन्या वाहनांमध्ये एअरबॅगची मुदत तीन महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Toyota ने भारतात लॉन्च केली 14 सीटर MPV Hiace, जाणून घ्या किंमतीसह खासियत
बदलत्या तंत्रज्ञानाचा विचार केला असता बहुतेक कार उत्पादक आपल्या टॉप मॉडेलमध्ये एअरबॅग देतात. तथापि, बहुतांश गाड्यांमध्ये फक्त ड्रायव्हर सीटच एअरबॅग बसविली जाते. आता समोर बसलेल्या ड्रायव्हरसह राइडसाठी एअरबॅग देखील अनिवार्य होत आहेत.
कारच्या धक्क्यावर सेन्सर बसविला आहे. कार एखाद्या गोष्टीला धडकताच सेन्सरमधून करंट एअरबॅग्ज सिस्टमवर पोहोचतो आणि एअरबॅग्जच्या आत सोडियम अॅजाइड गॅस भरला जातो. करंट सापडताच तो गॅसच्या बलूनमध्ये रुपांतरित होतो. एअरबॅग उघडण्यास सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. यामुळे प्रवाशास कोणत्याही प्रकारची इजा होण्याची शक्यता कमी असते.
अपघाताच्या वेळी बहुतांश मृत्यू प्रवाश्याच्या डोक्यावर डॅशबोर्डवर आदळल्याने किंवा कारच्या स्टीअरिंगमुळे होते. एअरबॅग्स सूतीपासून बनवलेल्या असतात, त्यांना सिलिकॉनसह लेपित केले जाते. एअरबॅगच्या आत, सोडियम अझिड वायूने भरलेले असते. यामुळे प्रवाशाच्या डोक्याला गंभीर दुखापत होत नाही.