BMW F 750 GS आणि F 850 GS भारतात लॉन्च ; पाहा काय आहेत दमदार फिचर्स आणि किंमत
BMW Motorrad India ने भारतात दोन नव्या अॅडव्हेंचर बाईक्स F 750 GS आणि F 850 GS लॉन्च केल्या आहेत.
BMW Motorrad India ने भारतात दोन नव्या अॅडव्हेंचर बाईक्स F 750 GS आणि F 850 GS लॉन्च केल्या आहेत. दोन्ही बाईक्स Standard, Pro आणि Pro Low Suspension नावाचे तीन वेरिएंट सादर केले आहेत. कंपनीने बीएमडब्ल्यू F 750 GS आणि बीएमडब्ल्यू F 850 GS याच्या स्टॅंडर्ड वेरिएंटची किंमत अनुक्रमे 11.95 लाख रुपये आणि 12.95 लाख रुपये ठेवली आहे. या दोन्ही बाईक्सची स्टायलिंग बीएमडब्ल्यूच्या फ्लॅगशिप अॅडव्हेंचर टूर बाईक R 1200 GS वरुन प्रेरीत झाली आहे. या दोन्ही बाईक्सची भारतात बुकींग सुरु झाली आहे.
फिचर्स
या दोन्ही बाईक्समध्ये सेमी डिजीटल इंटस्ट्रमेंट क्लस्टर लेन्स देण्यात आली आहे. यात ब्लूटुथ कनेक्टिव्हीटीसोबत 6.5 इंचाचा फुल कलर टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. बीएमडब्लूच्या या दोन्ही बाईक्समध्ये 853cc चं ट्विन-सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. F 750 चं इंजिन 77bhp च्या पावर आणि 83Nm टॉर्क जेनरेट करतं. तर F 850 मध्ये असलेलं इंजिन 85bhp आणि 92Nm टॉर्क जेनरेट करतं.
यात बेस वेरिएंटमध्ये Rain आणि Road असे दोन रायडिंग मोड आहेत. युजर्स Dynamic आणि Enduro नावाचे दोन वेगवेगळे ऑप्शनल रायडिंग मोड शोधू शकतात. इन मिड रेंज अॅडव्हेंचर टूरर बाईकमध्ये नवे मोनोक्रॉक फ्रेम आणि रिवाईज्ड सस्पेंशन दिले आहे. बीएमडब्ल्यू एफ 750 जीएस आणि बीएमडब्ल्यू एफ 850 जीएसच्या स्टॅंडर्ड वेरिएंटमध्ये स्लिपर क्लच, एएससी, ड्युअल चॅनल एबीएस, एलईडी हेडलाईट, क्रुझ कंट्रोल आणि डीआरएल सारखे फिचर्स देण्यात आले आहे.
याशिवाय या दोन्ही बाईक्सच्या प्रो वेरिएंटमध्ये डीटीसी (डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल), डायनॅमिक ईएसए (सेमी अॅक्टीव्ह सस्पेंशन सिस्टम), गिअरशिफ्ट असिस्ट ( क्विकशिफ्टर), कॉर्निंग एबीएस आणि लगेज पॅक सारख्या सुविधा दिल्या आहेत. तर Pro Low Suspension वेरिएंटमध्ये लोअर सीट हाईटसोबत सस्पेंशन कम करण्यासाठी एक किट देण्यात आले आहे.
बाईकच्या किंमत
तीन वेरिएंटमध्ये लॉन्च केलेल्या BMW F 750 GS च्या स्टॅंडर्ड वेरिएंटची किंमत 11, 95,000 रुपये आहे. तर Pro Low Suspension वेरिएंटची किंमत 13, 20,000 रुपये आणि Pro वेरिएंटची किंमत 13, 40,000 रुपये आहे.
तर BMW F 850 GS स्टॅंडर्ड वेरिएंटची किंमत 12, 95,000 रुपये, Pro Low Suspension वेरिएंटची किंमत 14, 20,000 रुपये आणि Pro वेरिएंटची किंमत 14, 40,000 रुपये आहे. या सर्व किंमती भारतातील एक्स शोरुममधील आहेत.